शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने केल्या पपईच्या बागा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संकट आणि वाढत्या तापमानाचा फटका अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संकट आणि वाढत्या तापमानाचा फटका अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी येत नाही तर वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत. केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.नंदुरबार जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. यावर्षी पपईचा हंगाम सुरू झाला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. कोरोनाच्या धास्तीने व्यापारी आले नाहीत आणि जे आले त्यांच्याकडून मातीमोल भावात पपईची मागणी केली जात आहे. परिणामी दुष्काळात तेरावा महिना अशी गत बळीराजाची झाली आहे. जिल्ह्यात तापमानात अचानक वाढ झाली आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्यावर आहे. तापमानाचा पारा दुपारी १२ ते चार वाजेदरम्यान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस असतो. त्याचा परिणाम पपईच्या फळावर झाला असून ते झाडावर खराब होऊन पिवळी पडत आसल्याने ते काढून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाही. अनेक शेतकºयांनी पपईला योग्य भाव मिळत नसल्याने शेतातच ती खराब होत असल्याने नाईलाजाने पपईच्या शेतात रोटावेटर व कल्टीवेटर मारून पपईचे पिक शेतातून उखडून फेकले आहे.पपई पिकाचा शासनाने फळपीक योजनेत समावेश केला नसल्याने यास विम्याचे संरक्षण नाही. त्याचप्रमाणे हमीभाव नाही यामुळे व्यापारी प्रत्येक हंगामात शेतकºयांची दराबाबत फसवणूक करत असतात. दरवर्षी शेतकरी व व्यापारी यांच्यात पपईच्या दरावरून मोठा संघर्ष होतो. असे असतानाही जिल्ह्यात दरवर्षी पपई लागवड वाढत चालली आहे. नगदी पीक म्हणून शेतकºयांनी पपईच्या लागवडीवर भर दिला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईचे उत्पादन घेतले जाते. मात्र त्याची विक्री परप्रांतीय व्यापाºयांच्या हातात असते. उत्तर भारतात थेट जम्मू-काश्मीरपर्यंत येथील पपईला सर्वाधिक मागणी आहे. परिणामी परप्रांतीय व्यापारी जो दर देतील तोच शेतकºयांना घ्यावा लागतो. गेल्या चार वर्षात पहिल्यांदा शेतकºयांना १४ रुपये दर यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला मिळाला होता. त्यानंतर व्यापाºयांनी एकजूट करून चार ते पाच रुपये प्रति किलो एवढा दर खाली आणला होता. असे असतानाही शेतकºयांनी पपईची तोड सुरू ठेवली होती. मात्र कोरोनाचे संकट उद्भवले आणि पपईची तोड थांबली.