शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन वाढला शिथिलता मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यापूर्वी लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेले सर्व आदेश ‘जैसे थे’ राहतील असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे़ यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ संचारबंदीच्या कालावधीत ३१ मे मध्यरात्रीपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत़ यातून यापूर्वी काढलेले सर्व आदेश ३१ मे पर्यंत लागू असतील असे त्यांनी म्हटले आहे़ जिल्ह्यातील शहरी भागामध्ये सध्या सकाळी सात ते दुपारी १२ व सायंकाळी चार ते सायंकाळी सात या कालावधीत दुकाने सुरु ठेवण्यात येत आहेत़ यातून नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला असून व्यावसायिकांचे व्यवसाय काही अंशी सुरळीतपणे सुरु झाले आहेत़ लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरी नंदुरबार शहरासह शहादा, नवापुर, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या शहरांमध्ये बाजारपेठा सकाळी आणि सायंकाळी खुलत असल्याने अडचणी कमी झाल्या होत्या़ गेल्या तीन दिवसात कोठेही गर्दी किंवा अनुचित प्रकार घडलेले नसल्याने ३१ मे पर्यंत हे आदेश नियमित करण्यात आले असल्याची माहिती आहे़ग्रामीण भागात यापूर्वी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सूट देण्यात आली असल्याने तेथील अर्थचक्राला बºयापैकी गती आल्याचे चित्र आहे़ नियमांमध्ये शिथिलता दिली गेली असली संचारबंदी असलेल्या वेळेत फिरणाऱ्यांवर पोलीसांकडून कारवाई सुरु आहे़सध्या रमजान महिना सुरु आहे़ या पार्श्वभूमीवर कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा अशी मुस्लिम बांधवांची अपेक्षा होती़ जिल्ह्यात नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारात त्यांच्याकडून कपडे व इतर चीजवस्तू खरेदीसाठी भेटी दिल्या जात आहेत़ यातून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये उलाढाल वाढत आहे़