सिरम इन्स्टिट्यूटने सवलतीत लस देण्याची नंदुरबार पालिकेचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST2021-02-27T04:42:45+5:302021-02-27T04:42:45+5:30

नंदुरबार : शहरातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत कोरोना लस देण्यासाठी पालिकेने सीरम इन्स्टिट्यूटकडे सवलतीत लस मिळावी अशी मागणी पत्राद्वारे ...

Letter from Nandurbar Municipality for giving vaccine at a discount by Siram Institute | सिरम इन्स्टिट्यूटने सवलतीत लस देण्याची नंदुरबार पालिकेचे पत्र

सिरम इन्स्टिट्यूटने सवलतीत लस देण्याची नंदुरबार पालिकेचे पत्र

नंदुरबार : शहरातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत कोरोना लस देण्यासाठी पालिकेने सीरम इन्स्टिट्यूटकडे सवलतीत लस मिळावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. सध्या सवलतीच्या दरात २२० रुपयांना एक डोज मिळत आहे. त्यात आणखी सवलत मिळावी अशी अपेक्षा पालिकेची आहे.

नंदुरबार पालिकेने शहरातील सुवर्ण जयंती दारिद्र्य रेषेखालील जनतेला मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: २० ते २२ हजार जणांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूददेखील केली आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने सवलतीच्या दरात लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालिकेतर्फे नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, जिल्हा केंद्र सरकारच्या यादीत आकांक्षित जिल्हा म्हणून नोंद आहे. जिल्ह्याचा मानव निर्देशांक सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. शिवाय पालिकेची आर्थिक स्थितीही लक्षात घेता सवलतीत लस मिळावी अशी मागणी या पत्रात केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट याबाबत काय निर्णय घेते याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Letter from Nandurbar Municipality for giving vaccine at a discount by Siram Institute