पाटबंधारे विभागाचे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना काम थांबविण्याबाबत पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:25+5:302021-07-02T04:21:25+5:30

आष्टे येथील विहिरीपर्यंत सध्या आंबेबारा धरणातून पाटचारीव्दारे पाणी आणले जाते. नगर परिषदेतर्फे या वर्षापासून पाईपलाईनने पाणी आणण्याचे नियोजन करण्यात ...

Letter of Irrigation Department to the Municipal Council Chief regarding suspension of work | पाटबंधारे विभागाचे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना काम थांबविण्याबाबत पत्र

पाटबंधारे विभागाचे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना काम थांबविण्याबाबत पत्र

आष्टे येथील विहिरीपर्यंत सध्या आंबेबारा धरणातून पाटचारीव्दारे पाणी आणले जाते. नगर परिषदेतर्फे या वर्षापासून पाईपलाईनने पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आल्याने यास येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. नगर परिषदेला पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र ते पूर्वीप्रमाणेच पाटचारीव्दारे न्यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते. यावर पाटबंधारे विभागाने मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सुरू करण्यात येणारे पाईपलाईनच्या कामास जलसंपदा विभागाची रितसर परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच आंबेबारा लघु प्रकल्प योजनेतून घ्यायच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणतेही कायमस्वरूपी आरक्षण केलेले नाही. त्यामुळे सदर कामास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तरी सदर काम त्वरित थांबवावे. याउपरही काम सुरू केल्यास महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.

Web Title: Letter of Irrigation Department to the Municipal Council Chief regarding suspension of work