म्यूट माईकमध्येच शिक्षकांनी शिकविला पाठ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST2021-06-19T04:21:08+5:302021-06-19T04:21:08+5:30

दहावी व बारावीचे ऑनलाइन क्लास शाळेतूनच घेण्यास शिक्षकांना बजावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये एकाच लिंकवर दोन ते तीन ...

The lesson taught by the teacher in the mute mic ... | म्यूट माईकमध्येच शिक्षकांनी शिकविला पाठ...

म्यूट माईकमध्येच शिक्षकांनी शिकविला पाठ...

दहावी व बारावीचे ऑनलाइन क्लास शाळेतूनच घेण्यास शिक्षकांना बजावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये एकाच लिंकवर दोन ते तीन शिक्षक आपली तासिका घेत आहेत. परंतु त्यातही गोंधळाची स्थिती अधिक राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच मनोरंजन होऊ लागले आहे. दररोज एक ना अनेक किस्से घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये संबंधित किस्सेदेखील चविस्टपणे ऐकवले जात असतात. एका शाळेतील ऑनलाइन क्लासमध्ये काही विद्यार्थी टारगट होते. त्यामुळे क्लास सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांना माईक म्यूट करून ठेवण्यास सांगितले. जो माईक ऑन करेल त्याला पनिशमेंट भेटेल म्हणून सांगितले गेले. ते करताना स्वत: शिक्षकांचाही माईक म्यूट झाला. शिक्षक समोरून जीवतोडून शिकवू लागले, इकडे विद्यार्थ्यांना आवाजच येत नसल्याने काहीच समजत नव्हते. जर माईक अनम्यूट केला तर पनिशमेंटची भीती. त्यामुळे कुणीच विद्यार्थी शिक्षकांना सांगण्याची हिंमत करीत नव्हता. त्यातच एका विद्यार्थ्याने हिंमत करून माईक अनम्यूट करीत शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचे ऐकण्याच्या आधी शिक्षकांनी विद्यार्थ्याला खडसावले, परंतु विद्यार्थ्याने त्याचे म्हणणे पूर्ण केलेच. परिणामी शिक्षकांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी ती सुधारली. यामुळे मात्र शिक्षकांना पुन्हा पाच मिनिटे शिकवलेला भाग पुन्हा रिपीट करावा लागला.

-मनोज शेलार, नंदुरबार

Web Title: The lesson taught by the teacher in the mute mic ...