शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा शिवारात बिबटय़ा मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जितेंद्र पाटील यांच्या शेतात शनिवारी बिबटय़ा  मृतावस्थेत आढळून आला. त्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जितेंद्र पाटील यांच्या शेतात शनिवारी बिबटय़ा  मृतावस्थेत आढळून आला. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी शेतात एकच गर्दी केली होती. वनविभागाने या मृत बिबटय़ाची विल्हेवाट लावली. सविस्तर वृत्त असे की, प्रकाशापासून हाकेच्या अंतरावर जितेंद्र भरत पाटील यांच्या शेताच्या बांधावर वाघ झोपला आहे, असे प्रथमदर्शनी दिलीप वळवी यांना जाणवले. त्यांनी शेतमालक जितेंद्र पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन ही माहिती दिली. पाटील हे शेतात आल्यानंतर जवळ जाऊन पाहिले तर बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी ही माहिती शहादा वनविभाग व प्रकाशा दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा:यांना कळवली. वनविभागाच्या कर्मचा:यांनी पाहणी केल्यानंतर अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाचा मादी बिबटय़ा असून त्याला ब:याच दिवसापासून अन्न न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या कर्मचा:यांनी काढला. पंचनामा झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश देशमुख व डॉ.सागर परदेशी यांनी जागेवरच या बिबटय़ाचे शवविच्छेदन करून नाशिक व हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत व्हीसेरा पाठविण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतर उपवनसंरक्षक सुरेश कवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनरक्षक राजेंद्र झगडे, वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनपाल बाळासाहेब इंदवे, विक्रम पदमोर, अनिल बोरुडे, वनरक्षक बिलाल शहा, सुभाष मुकाळे, प्रवीण वाघ, दीपक परदेशी, कुशल पावरा आदींनी या बिबटय़ाचा अंत्यविधी करून विल्हेवाट लावली. या वेळी जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, सचिन चौधरी, पोलीस कर्मचारी गौतम बोराळे, शोएब शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, धुरखेडा रस्त्यावर सचिन सखाराम चौधरी यांच्या शेतातील पाण्याच्या टाकीवर दोन बिबटे व त्याचे दोन बछडे रखवालदाराला आढळून आले. शेतमालक सचिन चौधरी यांनी याबाबत शहादा वनविभाग व प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात कळविले आहे.