शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ची जिल्हाधिकारी कार्यालयात तर पं.स.ची तहसील कार्यालयात सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

या निवडणूक विभाग व निर्वाचक गणात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या ...

या निवडणूक विभाग व निर्वाचक गणात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ४ मार्च २०२१ पासून रद्द करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. या सर्व जागा सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भरणे आवश्यक असल्याने महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील रिक्त ११ पैकी पाच निवडणूक विभाग आणि १४ निर्वाचक गणांपैकी आठ गण महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. निर्वाचक गणापैकी अक्कलकुवा तालुक्यातील एक, शहादा चार आणि नंदुरबार तालुक्यातील तीन निर्वाचक गणातील जागा महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत.

जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी सकाळी ११ वाजता महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. अंतिम आरक्षण सुधारणा आदेशाच्या स्वरुपात २४ मार्च रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. तालुकास्तरावरील सोडतीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सोडतीवर देखरेख करण्यासाठी एक उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.

सोडतीच्या वेळी अंतर ठेऊन बैठक व्यवस्था, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्कॅनिंग व शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्देश दिले आहेत.