शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाच्या चोरीतील आरोपी एलसीबीने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ब्रिटीश अंकुशविहिर, ता.अक्कलकुवा येथील दीड लाखाच्या चोरीच्या घटनेतील संशयीत दोघांना एलसीबीच्या पथकाने तळोदा येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ब्रिटीश अंकुशविहिर, ता.अक्कलकुवा येथील दीड लाखाच्या चोरीच्या घटनेतील संशयीत दोघांना एलसीबीच्या पथकाने तळोदा येथे अटक केली. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संदीप अरुण तडवी व अजय भामट्या वळवी, दोन्ही रा.बेडापाडा, ता.तळोदा अशी संशयीतांची नावे आहेत. अक्कलकुवा तालुक्यतील ब्रिटीश अंकुश विहिर येथील संजय तडवी यांच्या घरातून चोरट्यांनी १४ मे रोजी रात्री दीड लाख रुपये रोख व तीन मोबाईल चोरून नेले होते.
चोरीच्या या घटनेबाबत एलसीबीकडून तपास सुरू होता. नुकतेच पॅरोलवर सोडलेल्या काही चोरट्यांवर एलसीबीची नजर होती. त्यादृष्टीने पाळतही ठेवण्यात आली होती. परंतु त्यातील कुणीही यात सहभागी नसल्याचे स्पष्ट झाल्यावर एलसीबीने दुसरीकडे मोर्चा वळविला.
याच दरम्यान, तळोदा येथे दोन युवक महागडे मोबाईल कमी किंमतीत विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने पथकाला पाठवलि. तळोद्यातील स्मारक चौकात चॉकलेटी रंगाच्या दुचाकीवर दोन युवक संशयीतरित्या आढळले.
त्यांची चौकशी करीत त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी संदीप तडवी व अजय वळवी अशी त्यांची नावे सांगितली. त्यांची झडती घेतली असता तीन महागडे मोबाईल त्यांच्याकडे आढळले. त्यांना बोलते केले असता त्यांनी ब्रिटीश अंकुश विहिर येथील चोरीची कबुली दिली. त्यांना अक्कलकुवा पोलिसांच्यात ताब्यात देण्यात आले.
त्यांच्याकडून दोन मोबाईल, दुचाकी जप्त करण्यात आली. रोख रक्कमेचीही माहिती काढली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार दिपक गोरे, सुनील पाडवी, मोहन ढमढेरे, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.