शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २०१ जणांनी संपविला जीवनाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

नंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात तब्बल २०१ जणांनी आत्महत्या करत जीवनाचा प्रवास ...

नंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात तब्बल २०१ जणांनी आत्महत्या करत जीवनाचा प्रवास संपवला आहे. बेरोजगारी, व्यसनाधिनता, काैटुंबिक वाद, लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यातून या आत्महत्या झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. नंतरच्या काळात सुरू झालेले लाॅकडाऊन हे बेरोजगारीचे कारण ठरले. दरम्यान, सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या उद्योगधंदे बंद ठेवण्यास परिणामकारक अशीच ठरली होती. यातून मार्ग काढून काहींनी नव्याने सुरुवात केली असली तरी, निवडक जणांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. जिल्ह्यात दर महिन्याला आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. मध्यमवयीन वयोगटातील आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. हाताचे काम गेल्याने बेरोजगार होऊन नैराश्यातील व्यसनाधिनतेने अनेकांचा बळी घेतला आहे. लाॅकडाऊन काळात घरीच राहून एकाकी पडल्याने काहींनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला असल्याचेही समोर आले आहे.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कोरोनामुळे मानसिक आजारांमध्ये वाढ झाली आहे. सौम्य ते अगदी मनोरुग्ण होण्यापर्यंतच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. नोकरी नाही, पैसे नाहीत, कर्ज होणे यातून स्वभावात बदल होतात. झोप उडते, चिंता, भीती वाटणे अशी लक्षणे आढळल्यास कुटुंबीयांनीही आधी संबंधिताला धीर देणे आवश्यक आहे.

ध्येयप्राप्तीतील अपयश येणे, असाहाय्यतेची भावना, डिप्रेशन, आर्थिक समस्या, ताण-तणाव हे आत्महत्येसारख्या निर्णयाकडे व्यक्तीला घेऊन जातात. अशा प्रकारचे विचार येत असतील, तर घरातील व्यक्तींनी हे जाणून घेतले पाहिजे. त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे, त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.

- डॉ. राजेश मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ

अशा झाल्या नोंदी...

आरोग्य विभागाकडून प्राप्त नोंदीनुसार जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये १०, मेमध्ये २०, जून १८, जुलै २२, ऑगस्ट १०, सप्टेंबर १८, ऑक्टोबर १७, नोव्हेंबर २०, डिसेंबर १५, जानेवारी २०२१ मध्ये २०, फेब्रुवारीत १७, तर मार्च महिन्यात १४ अशा २०१ जणांनी गेल्या वर्षात आयुष्य संपविल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे दिवसही जातील

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा काळ येत असतो. नंतर आनंदाचे क्षणही येत असतात. हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोरोना काळात पती-पत्नीमधील भांडणे वाढली. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा स्पेस कमी झाला. परंतु, प्रत्येकाने एकमेकांच्या गरजांचा, भावनांचा आणि मनाचाही आदर केला पाहिजे.