शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक अन्नधान्यासाठी कणीमाता पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अस्तंबा ता.धडगाव येथे दिवाळीच्या कालावधीत साजरी होणा:या ‘डोगोअ दिवाली’ नंतर सातपुडय़ातील आदिवासींमध्ये नवीन अन्नाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अस्तंबा ता.धडगाव येथे दिवाळीच्या कालावधीत साजरी होणा:या ‘डोगोअ दिवाली’ नंतर सातपुडय़ातील आदिवासींमध्ये नवीन अन्नाच्या पूजनाला सुरुवात झाली आहे. या पूजनाला तेथील भाषेत आठीवटी म्हटले जात असून कणीमातेने सर्व बांधवांना मुबलक अन्न-धान्य द्यावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. सातपुडय़ात भौगोलीक दृष्टय़ा प्रतिकुल परिस्थिती असल्यामुळे नगदी पिके घेता येत नसली तरी या भागात प्रामुख्याने अन्नधान्ययुक्त पिकांचीच लागवड करण्यात येते. या धान्याची पिक लागवडीपासून सेवन होईर्पयत वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची पूजा करण्यात येते. त्यात नवाय व आठीवटी या दोन महत्वाच्या पूजा आहेत.  नवाय ही पूजा दसरा साजरी होण्यापूर्वीच  केली जाते. तर अस्तंबा येथील ‘डोगोअ दिवाली’ साजरी झाल्यानंतर आठीवटीच्या पूजेला सुरुवात होते. अस्तंब्याच्या दिवाळीसाठी प्रत्येक घरातील प्रमुख व्यक्ती जात असतो. तेथे देखील मुबलक अन्नधान्यासाठी अन्नाचे कण सोबत घेऊन जात असते. अस्तब्याच्या शिखरावरुन उतरल्यानंतर आपापल्या सवळीनुसार हे बांधव आठीवटी या पूजेसाठी कुटुंबात तयारी सुरू करतात. गावातील सर्व मंडळींच्या सोयीनुसार ही पूजाविधी होते. ही पूजा रात्रीच्या वेळेलाच केली जात असून एका घरातील नवीन अन्न पूजेसाठी प्रथम गावातील सात, नऊ किंवा 11 व्यक्तींना वाहत्या नदीच्या निर्मळ पाण्यात रात्रीच्या वेळेस दुधाने विधीवत आंघोळ करावी लागले. शिवाय घरातील प्रमुख महिला देखील दुधानेच आंघोळ करीत  असते. नदीवरुन येतानाच तांब्याभर नदीचे पाणी सोबत आणावे लागते. शिवाय बेल झाडाच्या लहान फांद्याही आणाव्या लागतात. ही  पूजा परंपरेनुसार चुलीवर अथवा उखळावर केली जात आहे.  पूजेला सुरुवात करण्यापूर्वी शेणाने पुजेची जागा सारवली जाते, पुजेसाठी नवीन धान्य, कणसे, बेलपाने, विशिष्ट पद्धतीन बनवलेले लहान मडके (बोत), पेय पदार्थाच्या प्रसादासाठी दुधी भोपळ्यापासून निर्मित भांडे (डोवी)  यासह विविध साहित्य लागत आहे. या पूजेसाठी दुधाने आंघोळ करणा:या व्यक्तीला पूजा होईर्पयत काही व्रत (पालनी) पाळावी लागत आहे. विधीवत पूजेसाठी आंघोळ करणा:या प्रत्येक व्यक्तीला पूजेसाठी बसविले जात  आहे. पूजा करताना ज्वारीचे दाणे सोडली जात असून त्यात घरातील सर्व कोठय़ा, सर्व भांडी, उखळ, जातं यासह अन्य ¨ठकाणी देखील धान्याचे मुबलक प्रमाण राहावे यासाठी एकप्रकारची प्रार्थनाच केली जाते. या धान्यातून कुटुंबातील सर्व सदस्यांसह कार्यक्रमाला उपस्थित राहणा:या प्रत्येक व्यक्तीलाही धन लाभावे, अशीही प्रार्थना केली जात आहे. पूजा संपल्यानंतर संपूर्ण गाव मंडळींच्या उपस्थितीत विविध प्रसादाचा कार्यक्रम होतो. या मंडळींना पंगत देण्याची प्रथा असून यासाठी त्या-त्या घरातून पूर्वनियोजन करण्यात येत आहे. याच पंगतीत पूजा होणा:या कुटुंबातील सर्व सदस्यही आस्वाद घेत आहे.

बेल झाडात आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत. पोटदुखीपासून अनेक गंभीर आजारांवर बेलपाने गुणकारी असल्याचे विज्ञानाच्या आधारावर म्हटले जाते आहे. परंतु आदिवासींमध्ये कूठल्याही पूजाविधीसाठी बेलपानांचीच पहिले नैवेद्य (तेथील भाषेतील पाती) दिले जात आहे. त्यामुळे विज्ञान - तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वीच आदिवासींमध्ये या पानांना महत्व दिले जात असावे. धडगाव व मोलगी परिसरात होणारी आठीवटी (कणीमाता) पूजा ही देवानेच सुरू केलेली पूजा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बेलपानांमधील गुणांचा शोध देखी आदिवासींनीच आधी लावला असावा. असे म्हटले जात आहे.