शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अबालवृद्धांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. सूर्यग्रहण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. सूर्यग्रहण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये सकाळपासून उत्सुकता दिसून आली. सूर्यग्रहण पाहण्यासाठी शाळा, सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्था-संघटनांनी सौर चष्मे उपलब्ध करून दिले होते.गणपती मंदिर बंद, नंदुरबारनंदुरबार शहरातील गणपती मंदिरर् ग्रहण कालावधीत सकाळी सहा ते ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. या वेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. मात्र ग्रहण संपल्यानंतर मंदिर नागरिकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.ग्रहण काळात मंदिरे बंद, शहादाशहादा शहरात सूर्यग्रहणानिमित्त निसर्गाचा हा आविष्कार पाहण्याचा आनंद अनेक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी लुटला. ग्रहण काळात शहरातील बहुतांश मंदिरे बंद होती. सुमारे दहा वर्षानंतर सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने अनेकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून दिले होते. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाविषयी माहितीही दिली. सूर्यग्रहणा संदर्भात अनेक गैरसमज व अंधश्रद्धा असल्याने शहरातील सकाळी ८ ते १२ वाजेपर्यत बहुतांश मंदिरे बंद होती. त्यामुळे नेहमी सकाळी देवदर्शन घेणाºया भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच देवाचे दर्शन न घेता आल्या पावली परत जावे लागले. विद्यार्थ्यांना ग्रहण बघता यावे तसेच ग्रहणाविषयी समजुती-गैरसमजुतींचे निराकरण करता यावे यासाठी विशिष्ठ चष्मे उपलब्ध करून देत अप्रत्यक्ष सूर्यग्रहण दाखवून माहिती देण्यात आली.ग्रहण काळात अन्नधान्य, खाद्यपदार्थ किंवा जनजीवनावर विपरीत परिणाम होतो. अशा विविध गैरसमजुती आजही आहेत. मात्र प्रत्यक्षात ग्रहण म्हणजे निसर्गात घडणारी नयनरम्य घटना आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रहणाविषयी असणाºया गैरसमजुती दूर करता याव्यात यासाठी श्रीराम कोचिंग क्लासेसच्यावतीने विशिष्ठ प्रकारचे चष्मे उपलब्ध करन देत सूर्यग्रहण दाखविण्यात आले. ग्रहण पाहत असताना विद्यार्थ्यांच्या चेहºयावर ओसंडणारा आनंद आणि उत्सुकता वाखाण्याजोगी होता. या वेळी विद्यार्थ्यांना ग्रहणाविषयी पडलेल्या विविध प्रश्नांचे शिक्षकांनी निराकरण केले. 

जीवनशाळेच्या विद्यार्थ्यांना सौर चष्मे वाटपनंदुरबार : नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालविण्यात येणाऱ्या धडगाव तालुक्यातील त्रिशूल, थुवानी, भाबरी व अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेल, डनेल या सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी सूर्यग्रहण अनुभवले. नर्मदा जीवनशाळाच्या शहादा तालुक्यातील जीवननगर (वाडी पुनर्वसन) येथील विद्यार्थ्यांनीदेखील सूर्यग्रहण पाहिले. याशिवाय मध्य प्रदेशातील खाºया बादल व भीतडा येथील विद्यार्थ्यांनीदेखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी सौर चष्मे उपलब्ध करून देण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रात काम करणाºया प्रथम संस्था या स्वयंसेवी संस्थेने नर्मदा आंदोलनामार्फत चालविण्यात येणाºया जीवन शाळेच्या ८६५ विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण बघण्यासाठी सौर चष्मे उपलब्ध करून दिले होते. या वेळी विद्यार्थ्यांना व सूर्यग्रहण, सूर्यमाला व विज्ञानाच्या गोष्टीदेखील शिकवल्या.