शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेतून सुरु झाला टाकाऊ वस्तुंचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : विज्ञान - तंत्रज्ञानाच्या युगात देखील समाज जुनाट व कालबाह्य रूढी परंपरांचा अवलंब करीत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : विज्ञान - तंत्रज्ञानाच्या युगात देखील समाज जुनाट व कालबाह्य रूढी परंपरांचा अवलंब करीत आहे. याचाच प्रत्यय सध्या अक्कलकुवा ते खापर दरम्यान रात्रीतून टाकाऊ वस्तूंच्या प्रवासातून येत आहे.विविधतेने नटलेल्या समाजात अनेक रूढी, परंपरा आहे. त्यातील काही वैज्ञानिक तथ्यावर आधारित आहेत तर काही निव्वळ अंधश्रद्धेवर पोसल्या गेलेल्या आहे. गावातील रोगराई घालवण्यासाठी घरातील टाकाऊ वस्तू एका गाववेशीवरून दुस:या गावाच्या वेशीवर टाकण्याची ही प्रथा त्यातलीच एक. या प्रथेमुळे खापर ते अक्कलकुवा दरम्यान घरातील झाडू, खराटे, कंगवे व लहान कोठय़ा, टोपल्या व अन्य टाकाऊ वस्तूचा प्रवास घडून येत आहे.यावर्षी पावसाळ्यात सातपुडय़ाच्या पर्वतरांगेत व पायथ्याशी पावसाची संततधार होती. त्यामुळे पावसाळ्यात व नंतरही या भागातील गावात व्हायरल इन्फेक्शनसह थंडीताप, मलेरिया, टायफॉईड यांच्यासह डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आली. आपल्या गावात अश्या प्रकारची रोगराई पसरू नये म्हणून काही गावातील लोकांनी आपल्या घरातील विविध वस्तू त्यात झाडू, खराटे, कंगवे, लहान-मोठय़ा टोपल्या,  अन्य टाकाऊ वस्तू यांचा समावेश आहे. रात्री दुस:या गावाच्या वेशीवर टाकून आले असल्याचे सांगितले जाते. असे केल्यास गावातील रोगराई या वस्तूच्या माध्यमातून गावाच्या हद्दीबाहेर परंपरागत व विधिवत साहित्यासह टाकल्या जातात. असे केल्यास गावाला संभाव्य रोगराईपासून वाचवता येते, अशी अंधश्रद्धा आहे. ज्यांच्या गावाच्या वेशीवर ह्या वस्तूंचा जथ्था आला असेल त्या गावांतील काही लोक रात्रीतून त्या वस्तू दुस:या गावाच्या वेशीवर टाकून येतात. अश्याप्रकारे या टाकाऊ वस्तूचा प्रवास एका गावाच्या वेशीपासून दुस:या गावाच्या वेशीर्पयत घडून येत आहे.