शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये सरपंच-उपसरंपच निवडीनंतर जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST

कुकावल, ता. शहादा कुकावल येथील ग्रामपंचायतची निवडणूक यंदा चुरशीची ठरली होती. तब्बल ५० वर्षांनंतर ग्रामपंचायतीत परिवर्तन घडले. यातून ...

कुकावल, ता. शहादा

कुकावल येथील ग्रामपंचायतची निवडणूक यंदा चुरशीची ठरली होती. तब्बल ५० वर्षांनंतर ग्रामपंचायतीत परिवर्तन घडले. यातून परिवर्तन ग्रामविकास पॅनलला एक हाती सत्ता मिळाली. याठिकाणी सरपंचपदी जयवंत नीळकंठ पाटील तर उपसरपंचपदी मुमताजबी हरून मौलापाटील यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एस. जडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. निवडीनंतर ग्रामविकास पॅनलप्रमुख पंडितराव नेरपगार, माजी सरपंच प्रा. भरत देसले यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा गाैरव केला. यावेळी उद्धव बोरसे, अशोक लोहार, देवीदास नेरपगार, युवराज नेरपगार, रवींद्र बोरसे, युवराज मालचे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेसाठी ग्रामसेवक पी. व्ही.बाविस्कर, तलाठी जे.पी. अहिरे, पोलीस पाटील भूषण वंजारे यांनी परिश्रम घेतले. सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तोरखेडा ता. शहादा

शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा गरुड तर उपसरपंचपदी परसराम सुराजी रामोळे यांची निवड करण्यात आली. तोरखेडा येथे सरपंच व उपसरपंच निवड चुरशीची झाली. मनीषा गरुड यांच्यामार्फत उभे करण्यात आलेल्या सहा सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सरपंचपदी निवड झालेल्या मनीषा गरुड ह्या प्रतिस्पर्धी भारती पीतांबर शेळके यांच्यापेक्षा एका मताने निवडून आल्या. मनीषा गरुड यांना सहा तर भारती शेळके यांना पाच मते मिळाली. उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केलेल्या परशराम रामोळे यांना सहा तर त्यांच्याविरोधातील कल्पेश घोरपडे यांना पाच मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जुबेर पठाण यांनी कामकाज पाहिले. सरपंच निवडीत ऐनवेळी सहा जणांनी घेतलेल्या तटस्थ भूमिकेची तोरखेडा गावात एकच चर्चा रंगली होती.

सारंगखेड्याच्या सरपंचपदी पृथ्वीराज रावल बिनविरोध

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे सरपंच व उपसरपंच निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या प्रक्रियेदरम्यान पृथ्वीराजसिंह दिलीपसिंह रावल यांची सरपंच बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदी अनिता न्हानभो भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एन. गावीत यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, तलाठी एस.एन. डिगराळे यांनी सहकार्य केले. निवडणूक प्रक्रियेवेळी ग्रामस्थ तसेच गावातील ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी यांनीही सहभाग नोंदवला. सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गावीत यांनी दोघांची बिनविरोध निवड घोषित केली. निवडीनंतर नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा गाैरव करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून गाैरव करण्यात आला. शहाद्यातील सारंगखेडा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

शहादा तालुक्यातील दुसरी लक्षवेधी ग्रामपंचायत असलेल्या मोहिदे तर्फे शहादे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रद्धा पुष्पराज पाटील यांची निवड करण्यात आली. उपसरपंचपदी ललिता पुरुषोत्तम पाटील यांची निवड झाली. दोघांची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडून असलेल्या सरपंच व उपसरपंच यांचा आमदार राजेश पाडवी, सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, सातपुडा कारखान्याचे माजी संचालक जयप्रकाश पाटील, माजी सरपंच भाऊभाई पाटील, महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे अकाउंटंट सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल जैन यांनी गाैरव केला.