शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी येथील चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

निवेदनात म्हटले आहे की, विसरवाडी येथे आम्ही सर्व अर्जदार सन १९७० ते ७५ पासून वास्तव्यास असून, सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे ...

निवेदनात म्हटले आहे की, विसरवाडी येथे आम्ही सर्व अर्जदार सन १९७० ते ७५ पासून वास्तव्यास असून, सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या मार्गावर आमची घरे व व्यावसायिक प्रतिष्ठाने होती. निवासी घरापासून राज्य महामार्ग हा ३० ते ४० मीटर दक्षिण दिशेस होता. मात्र सन १९८४ मध्ये राज्य महामार्ग दुरुस्तीच्या नावाने तीस ते चाळीस मीटर गावाच्या उत्तर दिशेने वळवून आमची रहिवास असलेली घरे उठवण्यात आल्यामुळे आम्ही बेघर झालो होतो. त्यानंतर ग्रामपंचायतने अतिक्रमित रहिवासी असलेल्या सर्वांना सन १९८८ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दक्षिण व उत्तर दिशेस राहणे कामी व घर बांधण्यासाठी पत्र दिले होते. त्याअनुषंगाने संबंधित रहिवाशांनी पक्के व पत्र्याचे तसेच आरसीसीचे पक्के घर बांधून रहिवास म्हणून वापर करत आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने येथील रहिवाशांना मात्र कुठल्याही प्रकारची शासकीय नोटीस व आदेश न देता रस्त्याचे काम करणारे ठेकेदारांचे कर्मचारी येऊन संबंधित रहिवाशांना व व्यवसायिकांना ते राहत असलेली जागा मोकळी करून देण्यासाठी तोंडी सूचना देत आहेत. कोणतीही लेखी सूचना न देता जागा रिकामी करून देण्यास सांगून एक प्रकारे आमच्यावर अन्याय केला जात असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण गावाबाहेरून होणेसाठी ग्रामपंचायत विसरवाडी यांनी सन २०१२ ते १५ पर्यंत वेळोवेळी तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. तरीदेखील आमचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. महामार्गाच्या कामामुळे सर्व बाधित रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली असून, दुकानेही जात असल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा बिकट स्थितीत आमचे मनोधर्य खचत असून, संबंधित वरिष्ठांनी भरपाई देऊन व पुनर्वसन करून आम्हाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. न्याय न मिळाल्यास आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी बाधितांनी निवेदनाद्वारे केले आहे.

निवेदनावर सरपंच बकाराम गावित, संतोष चौधरी, भटू पाटील, मोहन गोसावी, विजय रमणलाल अग्रवाल, शंकर गावीत, कर्तारसिंग राजपूत, तापाबाई सावळे, शहीदा खाटिक, जीवन तांबोळी, किसन हिरे, मायाबाई दाभाडे, दिनेश जयस्वाल, नीलेश जयस्वाल, सचिन लोहार यांच्यासह ६० नुकसानग्रस्त रहिवाशांच्या सह्या व अंगठे आहेत.