शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

कामांची अनियमितता आणि नोंदीमध्ये संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पेसाचा पाच टक्के निधी आणि 14 वा वित्त आयोगाचा आलेला निधी कामे दाखवून हडप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पेसाचा पाच टक्के निधी आणि 14 वा वित्त आयोगाचा आलेला निधी कामे दाखवून हडप केल्याचा प्रकार गोरंबा, ता.धडगाव येथील ग्रामपंचायतीत उघड झाला आहे. 2015 ते 2018 या काळात हा प्रकार झाला आहे. गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून अखेर गुन्हा दाखल केल्याने तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांना आता गजाआड व्हावे लागणार आहे. गोरंबा ग्रामपंचायतीला 2015-16 व 2017-18 मध्ये पाच टक्के पेसा अबंध निधी योजना अंतर्गत एकुण 57 लाख 62 हजार 296 रुपये, मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत चार लाख रुपये, बँक व्याज रक्कम दोन लाख 99 हजार 697 रुपये असे एकुण 64 लाख 61 हजार 993 रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाले होते. त्यापैकी अनुदान लोकसंख्येनुसार तीन लाख 95 हजार 360 रुपये वर्ग करण्यात आले होते. ती रक्कम वर्ग करून ग्रामपंचायतीचे एकुण खर्च 15 लाख 51 हजार 619 करण्यात आला. सदरचा खर्च हा अंदाजपत्रक प्रमाणे मोजमाप पुस्तिका व प्रशासकीय खर्चाची बिले सादर न करता रक्कमेबाबत अनियमितता करून शासकीय निधीचा अपहार केल्याची पहिली फिर्याद गटविकास अधिकारी चंद्रकांत अरुण बोडरे यांनी दिली. त्यावरुन पिसीबाई दिलवरसिंग वळवी, सुभाष कागडा पाडवी दोन्ही ग्रामसभा कोष समिती सदस्य व ग्रामसेवक किशोर पराडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी फिर्याद देखील गटविकास अधिकारी बोडरे यांनीच दिली. गोरंबा ग्रामपंचायतीच्या खात्यावर 2015-16 व 2017-18 या आर्थिक वर्षातील 14 वा वित्त आयोगाअंतर्गत 44 लाख 69 हजार 953 व बँक व्याजाचे 16 लाख आठ हजार असे एकुण 46 लाख 37 हजार 955 रुपये जमा झालेले होते. त्यापैकी 11 लाख पाच हजार 997 रुपये तत्कालीन सरपंच भगतसिंग जि:या वळवी, ग्रामसेवक किशोर रुपसिंग पराडके यांनी कामांवर खर्च केले. हा खर्च अंदाजपत्रक प्रमाणे मोजमाप पुस्तिका व प्रशासकीय खर्चाची बिले सादर न करता गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.पहिल्या गुन्ह्यात 15 लाख 51 हजार 619 तर दुस:या गुन्ह्यात 11 लाख पाच हजार 997 रुपये असा एकुण 26 लाख 57 हजार 616 रुपयांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरिक्षक डी.एस.गवळी करीत आहे. 

पेसाचा पाच टक्के निधी खर्च करण्याचे काही सूत्र आहेत. त्या नुसारच हा निधी खर्च करता येतो. परंतु गोरंबा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा कोष समिती सदस्य आणि ग्रामसेवकांनी एकत्र येत त्याचा गैरव्यवहार केला. 14 व्या वित्त आयोगाचा निधी देखील ग्रामपंचायतींना मिळाला आहे. तो खर्च करण्यात आला असला तरी त्याच्या कामांची माहिती नियमानुसार लिहिली गेली नसल्याने या निधीचाही अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.