शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

परेदशातून परतलेल्या दोघांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात गुरुवारी परदेशातून आलेल्या दोघांवर उपचार करुन तपासण्या करण्यात आल्या आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात गुरुवारी परदेशातून आलेल्या दोघांवर उपचार करुन तपासण्या करण्यात आल्या आहेत़ दोघांनाही कोरोनाची लागण झालेली नसल्याची माहिती असून दक्षता म्हणून १४ दिवसांसाठी घरी बंदीस्त करण्यात आले आहे़ आतापर्यंत या कक्षात आतापर्यंत ११ जणांनी उपचार घेतले आहेत़कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कोणासह होऊ नये यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे़ परदेश तसेच परराज्यातून येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून कोरोना विषाणू जिल्ह्यात शिरण्याची भिती असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल परदेशातून येणाºया नागरिकांचा शोध घेत आहे़ यात गुरुवारी शिक्षणासाठी सिंगापूर येथे राहणारा युवक नटावद ता़ नंदुरबार येथे तर देसाईपुरा भागातील नोकरीनिमित्त लंडन येथे राहणारा युवक परत आल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात बोलावण्यात आले होते़ दोघांनीही दखल घेत कक्षात येऊन तपासण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत़ दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली तरी दक्षता म्हणून त्यांना घरी १४ दिवसांसाठी बंदीस्त करण्यात आले आहे़ त्यांच्यावर आरोग्य पथक लक्ष ठेवून राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ गुरुवारी दोघांची डॉ़ नरेश पाडवी, डॉ़ राजेंद्र चौधरी, डॉ़ मंगलसिंग पावरा, डॉ़ किरण जगदेव आणि डॉ़ कपिल दुसेजा यांच्या पथकांनी तपासणी केली़ तपासणीचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ के़डी़सातपुते यांना देण्यात आला होता़ दोघांमध्येही कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सहा बेडची व्यवस्था करण्यात आली होती़ याठिकाणी सध्या २० बेड वाढवण्यात आले असून दोनच व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे़ जिल्हा रुग्णालयाला राज्य शासनाकडून व्हेंटीलेटरची प्रतिक्षा असून याबाबत पाठपुरावा सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ यापूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या विशेष कक्षात तपासणी करुन घेतलेल्या सर्व ११ जणांची प्रकृती व्यवस्थित असल्याचा अहवाल देण्यात आला आहे़

एसटीचे २० लाखांचे नुकसानकोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने नंदुरबार आगारातून होणाऱ्या २४० फेºया आज रद्द केल्या़ यात शालेय विद्यार्थ्याच्या २२० फेऱ्यांचा समावेश आहे़ ग्रामीण भागातील २० फेºयाही बंद आहेत़ पुणे, मुंबई व नाशिक जाणाºया शिवशाही बसेसही बंद आहेत़ दरम्यान बसेसमध्ये १५ ते २० वाहून नेण्यावर भर दिला जात आहे़ कोरोनामुळे गुरुवारी दिवसभर बसस्थानकात तुरळक गर्दी होती़

विवाह सोहळ्यांमध्ये जनजागृतीएकीकडे कोरोनाची भिती असताना दुसरीकडे १९ मार्च रोजी असलेल्या मूहूर्तावर जिल्ह्यात तब्बल २५० विवाह सोहळे पार पडले़ या सोहळ्यांमध्ये कोरोनाचा जागर करण्यावर भर देण्यात आला़ प्रामुख्याने गर्दी करणे टाळावे अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना असल्या तरी कोरोनाच्या आपत्तीपूर्वीच हे विवाह सोहळे निश्चित झाले होते़ गुजर समाजाचे अध्यक्ष तथा सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी समाज बांधवांना सॅनेटायझरचा वापर, हँडवॉशचा वापर करुन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले़ तसेच ठिकठिकाणी सॅनेटायझर देऊन हात स्वच्छ करण्याची व्यवस्था वºहाडींसाठी करण्यात आली होती़ नंदुरबार आणि शहादा परिसरातील बºयाच विवाह सोहळ्या सॅनेटायझर्स व हँडवॉशचा वापर केला गेला़

आठवडे बाजार रद्दनंदुरबार शहरात दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार रद्द करण्यात आल्याचे पत्रक पालिका मुख्याधिकारी यांनी काढले आहे़ गेल्या मंगळवारी आठवडे बाजार करण्याबाबत सूचना करुनही नंदुरबारात बाजार भरला होता़ यातून जिल्हाधिकारी यांनी संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या़ या नुसार पालिका मुख्याधिकारी डॉ़बाबूराव बिक्कड यांनी आदेश काढून येत्या मंगळवारी होणारा आठवडे बाजार रद्द करण्यात येत असल्याचे कळवले आहे़ यानुसार अंमलबजावणी होण्याची अपेक्षा असून बाजारात येणाºया व्यापाऱ्यांना सोशल मिडियातून माहिती देण्यात येत आहे़