शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात उत्सुकता शिगेला, पैजाही लागल्या मोठय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सोमवारी मतदानाची धामधूम संपल्यानंतर आता सर्वानाच वेध लागले आहे ते निकालाचे. गुरुवारी मतमोजणी होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सोमवारी मतदानाची धामधूम संपल्यानंतर आता सर्वानाच वेध लागले आहे ते निकालाचे. गुरुवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्र्याची धडधड वाढली आहे. तर सामान्य मतदारांमध्ये कोण जिंकून येईल याची उत्सुकता वाढली आहे. प्रशासनाने देखील मतमोजणीसाठी कंबर कसली असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.अवघ्या पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सोमवारी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदार व कार्यकत्र्यामध्ये कमालीचा फरक दिसून आला. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये दिसलेला उत्साह, जोश या निवडणुकीत दिसून न आल्याने याचा परिणाम मतदानावर झाला. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील एकूण तीन लाख 20 हजार 403 मतदारांपैकी फक्त दोन लाख नऊ हजार 263 मतदारांनी म्हणजेच अवघ्या 65.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्यात एक लाख सात हजार 877 पुरुष मतदारांचा तर एक लाख एक हजार 385 महिला मतदारांचा समावेश होता. मतदानाची ही घसरलेली टक्केवारी कोणाच्या फायद्याची ठरते हे निकालावरुन स्पष्ट होईल.मतदानाची धामधूम संपल्याने प्रशासन आता मतमोजणीच्या तयारीस लागले आह. शहादा-तळोदा मतदारसंघाची मतमोजणी शहादा येथे तहसील कार्यालय सभागृहात होणार आहे. मतमोजणीसाठी 16 टेबल लावण्यात येणार असून एकूण 25 फे:यात मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलावर तीन मोजणी अधिकारी, एक सहाय्यक, एक पर्यवेक्षक व एक सूक्ष्म निरीक्षक अशा सहा जणांची टीम असणार आहे. मतमोजणीची सुरुवात पोस्टल मतदानाने होणार असून पोस्टल मतदान मोजून झाल्यावर मतदान यंत्रातील मतमोजणी करण्यात   येईल. मतमोजणीसाठी तहसील कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून    केवळ ओळखपत्र असणा:यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे व सहायक   निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले.