आंतरशालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:31+5:302021-02-23T04:48:31+5:30

प्रारंभी क्रीडा प्रमुख दिनेश ओझा यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे ...

Inter-school tennis cricket tournament | आंतरशालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा

आंतरशालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा

प्रारंभी क्रीडा प्रमुख दिनेश ओझा यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयेश वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला. या संघांना सचिन तेंडुलकर, सुनील गावकस्कर, एम.एस. धोनी, विराट कोहली अशी नावे देण्यात आली. यात सचिन तेंडुलकर या संघाने सुपर ओव्हरमध्ये विराट कोहली या संघावर दणदणीत विजय मिळविला. विजयी संघात कर्णधार भूषण पोटे, कार्तिक चौधरी, दर्शन बडगुजर यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. तर वेद चव्हाण, जयेश पाटील, चंद्रकांत साळवे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. या विजयी संघात दर्शन बडगुजर, तनिष चौधरी, रितेश चौधरी, मल्हार बनकर, कार्तिक चौधरी, योगेश पाटील, यक्ष पाटील यांचा समावेश होता. बक्षीस वितरणप्रसंगी मुख्याध्यापिका सुषमा शहा यांनी सांगितले, शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या जीवनात खेळाडूवृत्ती जोपासावी, आपल्या प्रतिस्पर्धकावर कसा विजय मिळवावा, हे शिवाजी महाराजांच्या जीवनावरून आपल्याला शिकायला मिळेल. या सर्व विजयी संघास शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शहा, उपमुख्याध्यापक राजेश शहा, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील, क्रीडा प्रमुख दिनेश ओझा यांच्या हस्ते पदक, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक भिकू त्रिवेदी, जगदीश वंजारी, कैलास वळवी, शिवाजी माळी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Inter-school tennis cricket tournament