शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तीन सीट मोटारसायकलस्वारांवर कडक कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

तळोदा : तालुक्यातील बोरद रस्त्यावर बुधवारी झालेल्या मोटारसायकलिंगच्या भीषण अपघात स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ...

तळोदा : तालुक्यातील बोरद रस्त्यावर बुधवारी झालेल्या मोटारसायकलिंगच्या भीषण अपघात स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. या घटनेत पाच जण मृत्युमुखी पडले होते. या वेळी त्यांनी तीन सीट मोटारसायकलचालकांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांना दिलेत.

त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक पंडित यांनी अवैध वाहतूक, तीन सीट मोटारसायकलस्वार व बुलेट मोटारसायकलच्या कर्कश आवाजावर गांभीर्याने कार्यवाही करण्याची सूचना स्थानिक पोलीस ठाण्यास दिलेत. कारण सुसाट व तीन सीट मोटारसायकल स्वार ही तालुक्यातील मोठी समस्या आहे. यामुळेच असे अपघात होत आहेत, असे मत त्यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केले. तालुक्यात १८ वर्षांखालील, विनापरवाना मोटारसायकलस्वार, धूम स्टाईल मोटारसायकल चालविणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे हा प्रकार वाढला आहे. त्यामुळे अशा टारगट मोटारसायकलस्वारांना सर्वच नागरिक वैतागले आहेत. यावर पोलिसांकडून कडक कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक दिवसांपासून पोलीस कर्मचारी वसाहतींचा प्रश्न रखडलेला

पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. परिणामी पोलीस कर्मचारी पडक्या इमारतीत आपला जीव मुठीत घेऊन नाइलाजास्तव वास्तव्य करीत आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण खात्याकडे तळोदा पोलीस वसाहतीच्या बांधकामाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर कार्यवाहीदेखील सुरू आहे. त्यामुळे लवकरच पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस ठाण्याची पाहणी

या भेटीदरम्यान त्यांनी तळोदा पोलीस ठाण्याची संपूर्ण पाहणी केली. त्यांना पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृह पाण्याअभावी बंद असल्याचे निदर्शनास आले. तसेच पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या कांचा तुटलेल्या आढळल्यात. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून दुरुस्ती करण्याची सूचना दिली.

पोलीस स्टेशन हे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आहे

पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत असणे आवश्यक आहे. याबाबत जुन्या कुटीर रुग्णालयाच्या व सध्या कोर्ट असलेल्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांना विनाअडथळा व गतिमानतेने आपले कामकाज करता येईल. या नवीन इमारतीत पोलिसांना आपली वाहने व जप्त करून कार्यवाही केलेली वाहनांना पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. परिणामतः स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रश्न लवकरच सुटेल, असा आशावाददेखील त्यांनी बोलून दाखविला.