शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांकडून धरणांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

शहादा तालुक्यातील काकर्दा, तोरखेडा, काटघर, आभनपूर, कोंढावळ, तिखी धरणासह जयनगर, धांद्रे प्लॉट हद्दीतील लोकसहभागातून बांधण्यात आलेले पाझर तलाव, ...

शहादा तालुक्यातील काकर्दा, तोरखेडा, काटघर, आभनपूर, कोंढावळ, तिखी धरणासह जयनगर, धांद्रे प्लॉट हद्दीतील लोकसहभागातून बांधण्यात आलेले पाझर तलाव, नदी-नाल्यावरील पाझर तलाव, केटीवेअर बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांची पाहणी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी करून अधिकाऱ्यांना सूचना देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अभानपूर धरण कोणत्या विभागाकडे आहे हे अधिकाऱ्यांनाच सांगता येईना

अभानपूर धरणाची पाहणी करताना सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे खोलीकरण व्हावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावा. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अल्प प्रमाणात पाणी निचरा होत असल्याने कूपनलिका, विहिरींना पाहिजे तशी पाण्यात वाढ होत नसल्याने तसेच धरण परिसरातील झाडेझुडपे तोडून साफसफाई करीत किरकोळ दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. संपूर्ण धरणाची माहिती जाणून घेत आमदार डॉ.गावीत यांनी संबंधित धरणाचे बांधकाम केव्हा व कसे झाले. धुळे व नंदुरबार जिल्ह्याची हद्द कशी व कुठपर्यंत आहे अशी विचारणा केली. हा प्रकल्प कोणत्या विभागाकडे आहे, असा प्रश्न आमदारांनी अधिकाऱ्यांना विचारला असता संबंधित उपस्थित वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीच सांगता येईना. थोड्या वेळानंतर मध्यम प्रकल्प प्रकाशा विभागाच्या अनुभवी असलेल्या अधिकाऱ्याने हा प्रकल्प मृदजलसंधारण विभागाकडे असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांना अभानपूर धरण कोणत्या विभागाच्या देखभालीखाली आहे हे सांगता येत नसेल तर शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित करून आश्चर्य व्यक्त केले.

काटघर धरणाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पावसाळा झाला तरी धरणामध्ये पाणी न थांबता सँडवलद्वारे पाणी निघून जात असल्याने त्वरित दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा. इस्टिमेट तयार करा व शेतकऱ्यांचा हित जोपासणारा मोठा प्रकल्प असून तोरखेडा, काकरदा, फेस येथील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊ शकते. मात्र सँडवलद्वारे पाणी निघून जात असल्याने धरण कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बहुतांश जमीन कोरडवाहू झाली आहे.