शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी ग्रामीण भागात अभिनव क्लुप्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:43 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जागृती आणि दैनंदिन व्यवहारातील वागणुकीबाबत ग्रामीण भागातील जनतेला ऐरवी शहरी लोक ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जागृती आणि दैनंदिन व्यवहारातील वागणुकीबाबत ग्रामीण भागातील जनतेला ऐरवी शहरी लोक हिनवत असतात. मात्र कोरोना रोखण्यासाठी नव्हे तर ही साथ आपल्या गावापर्यंत येऊ न देण्यासाठी या वेळी मात्र सातपुड्यातील आदिवासी व ग्रामीण जनता शहरी जनतेपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे. विविध गावांमध्ये बाहेरील कोरोना लागणचा रूग्ण अथवा संशयीत आपल्या गावापर्यंत येऊच नये यासाठी गाव बंदीसह विविध प्रयोग राबवित आहेत.कोरोना या विषाणु जन्य आजाराने संपूर्ण जग हादरले आहे. देशातही त्याचे पडसाद सुरू झाल्याने खबरदारीच्या अनेक उपाययोजना सरकारतर्फे सुरू आहेत. विशेषत: २२ मार्चच्या जनता कर्फ्यु त्यानंतर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अर्थ सातपुड्यातील आदिवासी भागात व सातपुड्याच्या पायथ्यालगत असलेल्या ग्रामीण जनतेला चांगल्यापैकी आकलणास आला आहे. लॉकडाऊनची स्थिती असतांना शहरी भागातील लोक कुठले ना कुठले बहाणे बनवून बाहेर फिरण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे ग्रामीण भागातील जनता मात्र आपण बाहेर पडायचे नाही पण अनोळखी व्यक्तीलाही गावात येऊ द्यायचे नाही यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.गेल्या तीन-चार दिवसातील चित्र पाहिल्यास तळोदा तालुक्यातील सावर, इच्छागव्हाण यासह अनेक गावातील लोकांनी गावात बाहेरील व्यक्तिंनी प्रवेश करूच नये अशी सक्त ताकीद असलेले फलक लावले आहेत. तर मालदा येथील तरूणांनी रस्त्यांवर येऊन गावात कोणी अनोळखी व्यक्तीने येऊ नये यासाठी गावातील चारही बाजूच्या रस्त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. बामखेडा, ता.शहादा येथील महिला सरपंचांनी गावात चौका-चौकात मैफिल रंगविणाऱ्या तरूणांनी एकत्र येऊ नये व चावडीवरच्या गर्दीला आळा बसावा यासाठी विविध चौकातील बाकांवरच शेण टाकून लोकांना एकत्र येण्यापासून रोखले.सातपुड्यातील आदिवासी भागातही कोरोनापासून बचावाचे विविध प्रयोग दिसून येताहेत. या भागात बोलीभाषेतील लोकगीते, ध्वनी फिती या द्वारे तर जागृती होत आहेच पण अनेक गावातील लोकांनी आता बाहेरील व्यक्तींसाठी व वाहनांसाठी रस्तेच बंद केले आहेत. विशेषत: सिसा, ता.धडगाव व जामली, ता.अक्कलकुवा या दोन्ही गावातील लोकांनी गावाला येणाºया रस्त्यांवर मोठ-मोठे दगड ठेवून पूर्ण रस्तेच बंद केले आहेत. लॉकडाऊन असल्याने गावातील लोकांनीही बाहेर जाऊ नये व बाहेरील लोकांनीही गावात येऊ नये यासाठी असे प्रयोग केले जात आहे. या भागात रोजगाराची साधने नसल्याने लोकांना रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असला तरी सद्या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी येथील लोकही अधिक सज्ज व जागृत झाले आहेत.