शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

एक मीटर भूजल वाढीने यंदा सुकाळ शहरे व खेड्यातून बाद होणार दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:52 IST

 भूषण रामराजे   लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्षभर कोरोनाच्या भीतीत जगणाऱ्या जिल्हावासीयांना यंदा पाणीटंचाई भोगावी लागणार नसल्याचा निर्वाळा भूजल ...

 भूषण रामराजे  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षभर कोरोनाच्या भीतीत जगणाऱ्या जिल्हावासीयांना यंदा पाणीटंचाई भोगावी लागणार नसल्याचा निर्वाळा भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे.  विभागाने ऑक्टोबर अखेरीस केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी ३ मीटरवर स्थिर असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भूजल पातळी एक मीटरने वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस पडूनही जिल्ह्यातील भूजल पातळीत घट येत असल्याने २०१८ पर्यंत जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यातील विविध भागात गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होत होती. परंतु गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात पावसाने दिलेली १०० टक्के हजेरी व जलसंधारणाची कामे यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत एक मीटर भूजल स्थिर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. विभागाने नंदुरबार तालुक्यातील १३, नवापूर १५, तळोदा ३, शहादा ९, अक्कलकुवा ६ तर धडगाव तालुक्यातील ४ ठिकाणी विहिरी अधिग्रहीत करून त्यांचे सर्वेक्षण केले होते. यातून सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात ३.०७ मीटर, नवापूर २.१३, तळोदा ५.५७, शहादा ५.०७, अक्कलकुवा ३.५७ तर धडगाव तालुक्यात १.८० मीटरवर भूजल पातळी स्थिर असल्याचे समोर आले आहे. विभागाने निर्धारित केलेल्या ५० पैकी केवळ १४ विहिरींच्या पाणी पातळीत सर्वेक्षणादरम्यान घट आल्याचे, तर विहिरींची पातळी वाढल्याचे समोर आले होते. आजअखेरीस जिल्ह्यात  भूजल पातळी ही १.१६ मीटरने वाढली असल्याची माहिती आहे.

जिल्ह्याची भूजल पातळी एकमीटरने वाढली असल्याने चांगले संकेत मिळाले आहेत. जिल्ह्यात उदरात मुबलक पाणीसाठा आहे. परंतू या पाण्याचा योग्य पद्धतीने उपसा करणे गरजेचे आहे. यामुळे हे पाणी येत्या काळात टिकेल. जिल्ह्यात झालेली जलसंधारणाची कामे आणि पावसाचे पाणी जमिनीत गेल्याने पाणी पातळी वाढली आहे. नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई राहणार नाही. -आर.ओ.भगमार, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण विभाग, नंदुरबार.