शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणासह मनोधैर्यात देखील वाढ - सीईओ गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

या कार्यशाळेस समाजकल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, उमेदचे सह-जिल्हा अभियान संचालक, ...

या कार्यशाळेस समाजकल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, उमेदचे सह-जिल्हा अभियान संचालक, तथा प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी डॉ. वर्षा पडोळ, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर उपस्थित होते. उमेद अभियानाची नंदुरबार जिल्ह्यातील वाटचाल तसेच विविध समुदाय संस्थांना सुरू असलेले कामकाज, त्यांना वितरित निधीबाबत यशवंत ठाकूर यांनी माहिती दिली. समूहांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी त्यांना वेळोवेळी अर्थसहाय्य करणारे अशा उत्कृष्ट बँक असलेले महाराष्ट्र ग्रामीण बँक-शनिमांडळ, बँक ऑफ बडोदा-खांडबारा, स्टेट बँक ऑफ इंडिया विसरवाडी, बॅंक ऑफ बडोदा-पुरुषोत्तम नगर, एचडीएफसी बॅंक शहादा यांच्या शाखा व्यवस्थापकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अक्कलकुवा, शहादा व तळोदा तालुक्यातील नऊ सखींना मान्यवरांच्या हस्ते बायोमेट्रिक उपकरण वाटप करण्यात आले.

यावेळी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, उमेद अभियानअंतर्गत दशसूत्रीच्या माध्यमातून केवळ आर्थिकच नव्हे तर महिलांचे मनोधेर्य देखील उंचावले आहे. गावाच्या विकासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढला आहे. कृतीसंगमाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उमेद अभियान कटीबद्ध असून त्याकरिता जिल्हा व तालुकास्तरावरील यंत्रणा कार्यरत आहे. कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आवारात नंदुरबार व शहादा तालुक्यातील उत्पादक समूहांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील उमेश अहिरराव व चंद्रकांत चावरे यांनी परिश्रम घेतले. तसेच नंदुरबार व तळोदा तालुक्यातील प्रभाग समन्वयकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक प्रेरणा केदार व पूजा जाधव यांनी केले. तर आभार प्रदीप लाटे यांनी मानले.