शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सातपुडय़ातील दळणवळणावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर ते खाई दरम्यान वाडीखाडीपाडाजवळ व रायसिंगपूर-गोरजाबारी ते ओहवा दरम्यान बर्डीपाडा सरपचपाडाजवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर ते खाई दरम्यान वाडीखाडीपाडाजवळ व रायसिंगपूर-गोरजाबारी ते ओहवा दरम्यान बर्डीपाडा सरपचपाडाजवळ दरडी कोसळून रस्त्यावर दगड व मातीचा मलबा साचल्याने हे रस्ते गेल्या दोन दिवसांपासून बंद पडले आहेत. या रस्त्यांवरुन मोटरसायकलदेखील निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.सातपुडय़ाच्या पर्वत रांगांमधील घाट सेक्शनच्या भागात गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या संततधारेमुळे दरडी कोसळून रस्त्यावर मोठमोठे दगड व मातीचा मलबा कोसळून पडत असल्याने वाहनधारकांना त्रासदायक व अडचणीचे झाले आहे. घाट सेक्शनच्या कोयलीविहीर-कंकाळामाळ ते सिद्धीपाडा-खाई दरम्यान वाडीखाडीपाडाजवळ दोन-तीन ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून मातीचा मलबा कोसळून पडल्याने रस्ता पूर्ण बंद पडला आहे. या रस्त्यावरुन  दुचाकीदेखील निघत नसल्याने ईराईपाडा, सावरखाडीपाडा, बर्डीपाडा, ओहवा या गाव व पाडय़ांवरील नागरिकांना अडचणीचे व गैरसोयीचे झाले आहे. रायसिंगपूर-गोरजाबारी ते ओहवा दरम्यान बर्डीपाडा सरपचपाडाजवळही दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने दरडी कोसळून या रस्त्यावरही दगड व मातीचा मलबा पडल्याने दोन-तीन दिवसांपासून हा रस्ताही बंदच आहे. संबंधित विभागाने या रस्त्यांवरील दगड व माती हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी खाईच्या सरपंच शेमटीबाई पाडवी, गुलाबसिंग ओजमा पाडवी, राशा राया पाडवी व त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.दरम्यान, सातपुडय़ातील दुर्गम भागात पाच-सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यांनाही पूर आले आहेत. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर पूल नसल्याने त्या गाव व पाडय़ातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.