बदलत्या हवामानाचा आरोग्य व शेती कामांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:30+5:302021-03-19T04:29:30+5:30

बदलत्या हवामानमुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, थंडी, ताप, अंगदुखी, डोके दुखणे, डोळे दुखणे यासारखी लक्षणे दिसू लागली आहेत. व्हायरल ...

Impact of climate change on health and agriculture | बदलत्या हवामानाचा आरोग्य व शेती कामांवर परिणाम

बदलत्या हवामानाचा आरोग्य व शेती कामांवर परिणाम

बदलत्या हवामानमुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, थंडी, ताप, अंगदुखी, डोके दुखणे, डोळे दुखणे यासारखी लक्षणे दिसू लागली आहेत. व्हायरल फिव्हर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तशीच काहीशी अवस्था शेती कामांची झाली आहे. सद्यस्थितीत रब्बी हंगामाची मळणी जोरावर आहे. सकाळी ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होते. तशातच शेतीकामांची जुळवाजुळव करावी लागते. हार्वेस्टर, ट्रॅक्टर, मजूर, बाजारपेठ, शेतमालाला भाव या सर्वांचा अंदाज बांधून शेतीची कामे होत असल्याचे दिसून येत आहे. १७ ते २१ मार्च या कालावधीत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकंदरीतच हवामानाचा आरोग्यावर व शेती कामावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Impact of climate change on health and agriculture