शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकांच्या कार्यपद्धतीमुळे परिक्षार्र्थींच्या मनोधैर्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बारावी परीक्षेसाठी नेमलेल्या भरारी पथकातील काही अधिकारी तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे मनोधैर्य कमी करीत असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बारावी परीक्षेसाठी नेमलेल्या भरारी पथकातील काही अधिकारी तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे मनोधैर्य कमी करीत असल्याचे प्रकार परीक्षा केंद्रांवर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कॉपी केस करतांना कुठलीही शहनिशा न करता व विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून न घेता कारवाई केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबधितांना सुचना देवून कार्यपद्धती बदलण्यासंदर्भात सुचीत करावे अशी मागणी करण्यात येत आहे.सध्या सुरू असलेल्या बारावी परीक्षेसाठी व मंगळवारपासून सुरू होणाºया दहावी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकातील काही अतीउत्साही अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्याव्यतिरिक्त दुसºया तालुक्यांच्या परिक्षा केंद्रांवर जावून कॉपी संदर्भात तपासणी करीत आहे. या अधिकाऱ्यांची वागण्याची पद्धत आणि तपासणीच्या पद्धतीमुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे मनोबल कमी होत आहे. एकच पथक एवढ्या कॉपी केस कसे करीत आहेत हा संशोधनाचा विषयही ठरत आहे.शिवाय कॉपी केस करतांना संबधीत विद्यार्थ्याचे म्हणने ऐकुण घेणे नैसर्गिक न्यायाला धरून असतांना सरळ कॉपी केस करून संबधीत अधिकारी मोकळे होत आहेत. बेंचजवळ कॉपी पडलेली असली तरी संबधीत विद्यार्थ्याला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे कॉपी करणारा नामनिराळा व दुसराच विद्यार्थी भरडला जात आहे. नंदुरबार शहरातील एका केंद्रावर शुक्रवारी असा प्रकार घडल्याने संबधित विद्यार्थीनीला कारवाईला सामोरे जावे लागले.शिवाय नेमून दिलेल्या तालुक्याव्यतिरिक्त दुसºया तालुक्याच्या परिक्षा केंद्रावर जावून कारवाई केली जात असल्याने शिक्षण विभागातीलच काही अधिकारी संबधित भरारी पथकावर नाराज आहेत.जिल्हाधिकाºयांनी या प्रकाराची दखल घेवून विद्यार्थ्यांचे मनोबल कमी होणार नाही अशा पद्धतीने भरारी पथकांनी वागावे अशा सुचना द्याव्या अशी मागणी शिक्षकांसह पालक वर्गाकडून केली जात आहे.