आयान कारखान्याने केले अडीच लाख टन ऊसगाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:28+5:302021-03-07T04:28:28+5:30

ऊसगाळपासंदर्भात माहिती देताना सिनगारे यांनी सांगितले, समशेरपूर येथील आयान साखर कारखान्यात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसगाळपाचा ...

Ian factory has crushed 2.5 lakh tonnes of sugarcane | आयान कारखान्याने केले अडीच लाख टन ऊसगाळप

आयान कारखान्याने केले अडीच लाख टन ऊसगाळप

ऊसगाळपासंदर्भात माहिती देताना सिनगारे यांनी सांगितले, समशेरपूर येथील आयान साखर कारखान्यात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसगाळपाचा वेगही अधिक आहे. कारखाना उशिराने सुरू करण्यात आला. मात्र कमी वेळेमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या ऊसगाळपास प्राधान्य देण्यात आले. ४५ दिवसात दोन लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २,४२५ रुपये असा दर दिला आहे. दहा वर्षांच्या तुलनेत हा सर्वाधिक दर आहे. सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात एकरकमी जमा केले जातात. नोंद आणि बिगरनोंद उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा शेवटपर्यंत कार्यरत राहील. संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू राहील. येत्या ३० ते ४० दिवसात शिल्लक संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर विश्वास आहे आणि आगामी कालावधीतदेखील विश्वास कायम राहील. शेतकऱ्यांनी कोणत्याही चर्चा अथवा अफवांवर विश्वास न ठेवता आपला ऊस आयान शुगर कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन श्री. सिनगारे यांनी केले आहे.

Attachments area

Web Title: Ian factory has crushed 2.5 lakh tonnes of sugarcane