शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भितीतही जोपासला जातोय माणूसकीचा ‘ओलावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला दूर पळवायचे असले तर विलगीकरण हा एकमेव पर्याय आहे़ लागण झाल्यास आपल्या माणसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला दूर पळवायचे असले तर विलगीकरण हा एकमेव पर्याय आहे़ लागण झाल्यास आपल्या माणसांपासून दूर राहून कोरोनासोबत लढा शक्य आहे़ हे खरं असलं तरी कोरोनाच्या या भितीतही माणूसकीचा ओलावा मात्र कायम असल्याचे नंदुरबारात दिसून येत आहे़ शहरातील बाफना आणि पुजारा कुटूंबियांनी पोलीस, सफाई कामगार आणि गरजेच्या वेळी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत अन्नछत्र सुरु केले असून त्यांच्यापर्यंत दररोज अन्न पोहोचते करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे़शहरातील मिना कॉम्पलेक्स परिसरात राहणाºया बाफना कुटूंबाला चार दिवसांपूर्वीच्या जनता कर्फ्यू सुरु असताना महिला आणि पुरुष पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना जवळून बघण्याची संधी मिळाली़ घरासमोरच बंदोबस्त लागला असल्याने पोलीसांच्या हालचाली टिपणाºया जे़एच़बाफना यांनी पोलीस बांधवांना दिवसभर जेवणच मिळाले नसल्याचे लक्षात आले़ पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांच्या पत्नी आणि त्यांनी तातडीने घरातील गुजराती प्रकाराचा नाश्ता डब्यात भरुन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला़ दिवसभराच्या धावपळीने थकवा असलेल्या पोलीसांनी थोडे का होईना मिळालेले अन्न ग्रहण करत बाफना कुटूंंबाचे कौतूक केले़ याच दरम्यान शहरातील दुसरे आणखी सेवाभावी राजू पुजारा यांची आणि जे़एच़बाफना या दोघांची भेट झाली़ यावेळी संचारबंदी काळात दोघांनी मिळून पोलीसांना मोफत जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला होता़ गेल्या चार दिवसांपासून पुजारा आणि बाफना कुटूंबिय संयुक्तपणे शहरात सीबी पेट्रोलियम ते साक्री नाक्यापर्यंत नियुक्त असलेल्या सर्व पोलीस कर्मचाºयांना अन्नपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहेत़ विशेष म्हणजे सकाळ आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेस त्यांच्याकडून जेवण देण्यात येत आहे़ हे जेवण तयार करण्यासाठी एका माणसाला पैसे देऊन त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने तयार करुन घेत त्याचा पुरवठा करण्यात येतो़

अन्न देण्यापूर्वी सॅनेटायझरचा वापरदरम्यान बाफना आणि पुजारा कुटूंबियांच्या या अनोख्या सेवाभावात आरोग्याची काळजी घेण्याचा मात्र विसर पडलेला नाही़ जेवण वाटप करण्यापूर्वी जो व्यक्ती जेवण वाढणार त्याला आणि ज्याला द्यायचे आहे त्याला सॅनेटायझर आणि हँडवॉश सक्तीचे आहे़ दोन्ही गोष्टींचा योग्य वापर झाल्यानंतर मगच जेवण दिले जाते़ शहरातील किमान आठ पॉर्इंटवर नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दुचाकींवरुन हे जेवण वाहून नेले जाते़ केवळ सहकार्य म्हणून हा उपक्रम सुरु असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली़ पोलीसांनीही त्यांच्या सेवाभावाचे स्वागत केले आहे़ सकाळ आणि सायंकाळी असा दोन वेळ अन्नाचा पुरवठा होतो आहे़ विशेष म्हणजे आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून पोलीस बांधवांना दोन्ही कुटूंबियांना श्रीखंड देत त्यांचे तोंड गोड केले़

इतर ठिकाणीही गरजकोणत्याही प्रकारे गर्दी न करता योग्यपणे हा प्रयोग सुरु आहे़ यात आता शहरातील इतरांनीही दोन्ही कुटूंबांना सहकार्य करण्याचा निर्णय घेत पैसे देऊ केले आहेत़ परंतू पैश्यांपेक्षा सहकार्य देण्याचे दोन्ही कुटूंंबिय सांगत आहेत़एकीकडे सेवाभावी संस्थेविनाच पुढे आलेल्या या कुटूंबांचे कौतूक होत असताना दुसरीकडे शहराबाहेरील पाल टाकून वास्तव्य करणाऱ्यांची मात्र आबाळ सुरु आहे़ छोट्यामोठ्या वस्तू विक्री करुन गुजराण करणाºया या नागरिकांनाही अन्न कमावण्याचा हक्क आहे़ परंतू संचारबंदीमुळे त्यांचे किरकोळ व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या घरी खायलाच नसल्याचे चित्र आहे़ यामुळे त्यांच्याकडेही सेवाभावींनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़