शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वडफळी येथे घराला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील वडफळी येथे सुकलाल अर्जुन तडवी यांच्या घराला अचानक आग लागून नुकसान झाले़ आगीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील वडफळी येथे सुकलाल अर्जुन तडवी यांच्या घराला अचानक आग लागून नुकसान झाले़ आगीत हजारो रुपयांच्या रोकडसह जीवनावश्यक वस्तू संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घडली़ घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़
वडफळी येथील सुकलाल तडवी यांच्या घरातील शासकीय योजनेतून मिळालेल्या सौर संचाच्या बॅटरीचा मंगळवारी रात्री अचानक पणे स्फोट झाला़ यामुळे आग लागून काही क्षणातच संपूर्ण घरात आगीचा फैलाव झाला़ संपूर्ण लाकडी असल्याने आग आटोक्यात आली नाही़ यात जीवनावश्यक वस्तू संसारोपयोगी वस्तू, कुटुंबातील सदस्यांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले़ रौद्र रुप धारण केलेली आग विझवणे शक्य नसल्याने तडवी कुटूंबिय केवळ हतबल होऊन घराची होणारी राखरांगोळी पाहत होते़ आगीत तडवी यांचे घरासह सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे़
याबाबत वडफळी येथील तलाठी यांनी पंचनामा करुन तहसीलदार विजयसिंग कच्छवे यांच्याकडे सादर केला़ पंचनाम्यानुसार आर्थिक मदत देण्याची मागणी तडवी कुटंूबाकडून करण्यात येत आहे़

सुकलाल तडवी यांच्या पत्नी हंसा ह्या परीसरातील महिलांचे कपडे शिवण्याचे काम करतात़ आग लागली त्यावेळी त्यांच्याकडे शिवणकाम आले होते़ हे कपडेही यात जळून खाक झाल्याने नुकसान वाढले आहे़