शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाला मिळेना सुसज्ज इमारत यातून कसा होईल आयुष्यमान भारत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

नंदुरबार : दुर्गम भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी जमाना ता. अक्कलकुवा येथे सुरु केलेल्या ग्रामीण रुग्णालयाला इमारत मंजूर करुन ...

नंदुरबार : दुर्गम भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी जमाना ता. अक्कलकुवा येथे सुरु केलेल्या ग्रामीण रुग्णालयाला इमारत मंजूर करुन त्याचे बांधकामही पूर्ण करण्यात आले होते. परंतू गेल्या चार वर्षापासून तयार झालेल्या इमारतीचे हस्तांतरण रखडले असल्याने आयुष्यमान भारत या योजनेचाच एकप्रकारे बोजवारा उडाला आहे.

जमाना येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यात आल्यानंतर सुसज्ज दर्जाची इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम करण्याचे ठरवण्यात आले होते. यासाठी जागा निश्चित करुन आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा विभागाला इमारत बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानंतर संबधित विभागाने ठेकेदार नियुक्त करत २०१४ मध्ये इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. हे बांधकाम २०१६-१७ या वर्षात पूर्ण करण्यात आले आहे. यानंतर ही इमारत सुरु होऊन रुग्णसेवा होईल अशी अपेक्षा असताना चार वर्ष उलटूनही तिचे हस्तांतरण झालेले नाही. ही इमारत रुग्णालयाच्या वापरालायक नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. आर.डी.भोये यांनी ती ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यानंतर गेल्या चार वर्षात या इमारतीची मात्र प्रचंड दुरवस्थ झाली आहे.

दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे धारिष्ट्यही शहादा येथील बांधकाम विभागाने दाखवलेले नसल्याने शासनाचा निधी वाया जात आहे.

ही आहे समस्या

बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने तयार केलेली इमारत ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही इमारत म्हणजे भूलभूलैय्या असल्याचा प्रकार आहे. दरवाजा उलट दिशेने तर खोल्या चुकीच्या पद्धतीने बांधल्याने त्याठिकाणी रुग्णांवर इलाज करणे शक्य नसल्याने सांगण्यात आले आहे.

गांभीर्य वाढले

शासनाने रुग्णालयांच्या इमारतींसाठी दिलेल्या निकषातच ही इमारत बसत नसल्याची माहिती आहे. यातून बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची चाैकशी केली नसल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.

तब्बल १ कोटी ८० लाख रूपयांचा निधी ह्या इमारतीसाठी मंजूर करण्यात आला होता.

रुग्णालय आरोग्य केंद्रात सुरु : जमाना ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत मिळत नसल्याने सध्या रुग्णालय जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु आहे. या आरोग्य केंद्रात जागा अपुरी पडते आहे. यातून प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांचे हाल होत आहेत.

ठेकेदार म्हणतो इमारत योग्यच..

दरम्यान याबाबत संबधित इमारतीच्या ठेकेदाराला संपर्क केला असता, पाण्याची सोय आहे. इमारतही योग्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.

गेल्या चार वर्षांपासून पडून असलेल्या या इमारतीची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. यामुळे इमारतीचा निकाल लावण्याची गरज आहे.

जमाना येथे उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत सोयीच नाहीत. पाण्याची सोयही नाही. इमारतीबाबत बांधकाम विभागाला कळवले आहे. सोयी नसल्याने इमारतीचे हस्तांतरण केलेले नाही.

-डाॅ. आर.डी.भोये, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.