महेंद्र पब्लिक स्कूलतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:13+5:302021-03-08T04:29:13+5:30

शाळेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कारासह महिला पालकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्याध्यापिका ...

Honoring women police personnel with a cultural program by Mahendra Public School | महेंद्र पब्लिक स्कूलतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मान

महेंद्र पब्लिक स्कूलतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मान

शाळेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कारासह महिला पालकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्याध्यापिका पीनल शहा व महिला पालकांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आला. याप्रसंगी पोलीस दलात विशेष काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी अलका वसावे, कल्पना वसावे, देवकी वसावे, वंदना गावीत, धनश्री घुगे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महिला पालकांसह महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात विविध फनी गेम्सही घेण्यात आले. याप्रसंगी विजेत्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महिला पालकांसह शिक्षिका किंजल गुजराती, भावना वाघेला, पूनम पाटील, मनीषा मराठे आदी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन स्मिता वसावे व पायल पमनानी तर आभार सतीश शाह यांनी मानले.

Web Title: Honoring women police personnel with a cultural program by Mahendra Public School