सातपुड्यातील होलीकोत्सवास आज पासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:29 IST2020-03-03T12:29:24+5:302020-03-03T12:29:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील होळी मनसोक्त नाचायला, गायला लावणारी ठरते. यानिमित्त दु:खावर पडदा पाडत असून अनेक संकटे ...

Holikotsavas of Satpuda begin today | सातपुड्यातील होलीकोत्सवास आज पासून सुरुवात

सातपुड्यातील होलीकोत्सवास आज पासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यातील होळी मनसोक्त नाचायला, गायला लावणारी ठरते. यानिमित्त दु:खावर पडदा पाडत असून अनेक संकटे विसरुन आदिवासी बांधवांकडून आनंदाचा शोध घेतला जात आहे. गावाबाहेर गेलेली मंडळी मूळगावी परतले आहे. सर्वांच्या सहभागाने होळी गीते सुर धरु लागली तर गावागावात होळीनृत्यही फेर धरु लागले आहे. त्यामधूून निसर्ग नियमांवर आधारित जीवन पद्धती व जीवनमूल्ये मांडली जात आहे.
सादर होणारी गीते सातपुड्यातील आदिवासींना सुखसमृद्धीचा संदेश देत आहे. व्रत पाळणाऱ्या कलाकारांनी देखील त्यांना लागणाºया साहित्यांची जुडवा-जुडव करीत सहभाग नोंदवित आहे. होळीतील प्रमुख आकर्षण ठरणाºया मोरखीला डोक्यावर मोरपीसे, कमरेला बांधण्यासाठी पितळी घुंगरु, वाजविण्यासाठी खाट (माठाच्या काठेवर चामडे बांधलेले वाद्य). बावा या कलाकारास बांबूपासून निर्मित सजवलेला टोप, कमरेला बांधण्यासाठी दुधी भोपळे, लाकडी तलवारी, दोन्ही खांद्यावरुन छाती-पाठीवर गोलाकार स्वरुपात व दोन्ही हाताच्या मनगटावर बांधण्यासाठी पिंपळवर्गिय फळ (खोंदे) फळांची माळ, दोन्ही पायात बांधण्यासाठी छोटे धुंगरु तर ढाणका डोकोअं यास परकर व ब्लाऊज, एका हातात बांबूपासून निर्मित सुपडी, लाकडी मोठा चमचा (साटा), मोरावाल्याला धनुष्य, बाण व पाठीमागून कमरेला बांधण्यासाठी एक घुंगरू आदी तर प्रत्येकाला हातात व गळ्यात परिधान करायला चांदिचे दागिने साहित्य शिवाय स्वत:च्या चादरी, कपडेलत्ते देखील आवश्यक असते. त्यानुसार त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे.
आदिवासी देव-देवतांची भूमी असलेल्या मोरी राही (डाब, ता.अक्कलकुवा) येथे दि.५ मार्च रोजी संपूर्ण आदिवासींच्या साक्षीने देवाने सुरू केलेली होळी साजरी करण्यात येणार आहे. दि. ६ रोजी डाब ग्रामस्थ व धडगाव तालुक्यातील काकरपाटी, बोदला, खांडबारा, खेतीया (मध्यप्रदेश) येथील होळी साजरी करण्यात येणार आहे. असे नियोजित तारखेनुसार प्रत्येक गावांची होळी साजरी होणार आहे. प्रत्येक गावाची होळी ही पहाटे पहिला कोंबडा आरवताच होळी पेटवली जाणार आहे.
प्रत्येक गावाच्या होळीत अनेक ढोल दाखल होणार असून ढोलवर पहिली थाप पडताच महिला-पुरुष परंपरेनुसार नृत्यांचा फेर धरतील. रात्रभर नाच-गाणे सादर करीत वर्षभरातील दु:ख, असंख्य संकटांवर मात करण्याचा प्रयत्न होणार आहे.

होळी पेटल्यानंतर सकाळी बाहेरगावाहून आलेले बंधू-भगिनी, मोरखी (कलाकार), ढोल वादक-मालक यांची भोजन व अन्य सुविधा पंपरेनुसार ग्रामस्थांच्या एकजुटीने करण्यात येईल. सकाळी ११ वाजेपासून पुन्हा मेलादा (एकप्रकारची यात्रा) सुरू होईल. पोलीस पाटलांच्या घरी पूजा करून सर्वांच्या साक्षीने सायंकाळपर्यंत अखंड मेला (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. अन् त्या -त्या गावातील होळीचा निरोप घेतला जाईल. निरोप घेतानाच पुन्हा दुसºया गावातील होळीसाठी पुन्हा सात वाजेपर्यंत त्या-त्या गावात हे आदिवासी बांधव पोहोचतील, तेथेही परंपरेनुसारच हाळी साजरी होईल.

Web Title: Holikotsavas of Satpuda begin today