शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

बिबट्याच्या हल्ल्यात मयत बालिकेच्या वारसांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेच्या वारसांना आमदार राजेश पाडवी यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेच्या वारसांना आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. वनविभागाकडून शासकीय तरतुदीनुसार ही रोख स्वरूपात मदत देण्यात आली आहे.१६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारस तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सोजरबार येथील सहा वर्षीय चिमुकली शिला भिमसिंग नाईक हिला झोपडीत बिबट्याने हल्ला करत ती झोपेत असताना उचलून नेले होते. बिबट्याच्या या हल्ल्यात ती मृत्यूमुखी पडली होती. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत केली जाते. बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या शीला नाईक हिच्या वारसांना वनविभागाकडून १५ लाखांची मदत करण्यात आली असून गुरुवारी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मयत बालिकेचे वडील भीमसिंग चांद्या नाईक व आई पेटकीबाई नाईक यांना पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उर्वरित १० लाख रुपये हे राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपॉझीट म्हणून वारसांच्या नावावर ठेवले जाणार आहेत. यावेळी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, वनक्षेत्रपाल संरक्षक नीलेश रोडे, राजविहीर परिमंडळ अधिकारी वासुदेव माळी आदी उपस्थित होते.