देवगिरी कल्याण आश्रम छात्रालयातील विद्यार्थ्यांना सहयोग सोशल ग्रुपचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:32 AM2021-02-24T04:32:58+5:302021-02-24T04:32:58+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे येथील सहायक पोलीस निरीक्षक अरविंद वळवी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी व पोलीस उपनिरीक्षक ...

Helping hand of Sahayog Social Group to the students of Devagiri Kalyan Ashram Hostel | देवगिरी कल्याण आश्रम छात्रालयातील विद्यार्थ्यांना सहयोग सोशल ग्रुपचा मदतीचा हात

देवगिरी कल्याण आश्रम छात्रालयातील विद्यार्थ्यांना सहयोग सोशल ग्रुपचा मदतीचा हात

Next

प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे येथील सहायक पोलीस निरीक्षक अरविंद वळवी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी व पोलीस उपनिरीक्षक बडगुजर उपस्थित होते. प्रारंभी भारतमाता, याहा मोगी माता व स्वर्गीय वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नूतन रूमचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेल असे ५० ग्लास, ५० ताट, ५० वाटी, ५० भोजन पात्र, ५० चमचे, ५० तांबे, पाण्याची टाकी कढाई व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा व संरक्षण करणारे पोलीस अधिकारी अरविंद वळवी, सुरेश चौधरी व बडगुजर यांचा विशेष सत्कार सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन यांच्यातर्फे करण्यात आला. तसेच देवगिरी कल्याण आश्रम व एकलव्य छात्रावासचे पदाधिकारी संजय पाटील, विनीत वाणी, संतोष चौधरी, सुरेश जैन, व्यवस्थापक फुलसिंग पावरा, इनेश गावीत यांचासुद्धा सन्मान करण्यात आला. देवगिरी कल्याण आश्रमचे संजय पाटील यांनी सहयोग सोशल ग्रुपने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच देवगिरी कल्याण आश्रमाची स्थापना व वनयोगी स्वर्गीय बाळासाहेब देशपांडे यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. शिक्षण व संस्कार यांचा अनोखा मिलाफ असणाऱ्या वसतिगृहाची दिनचर्या व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. एकलव्य छत्रावास अक्कलकुवा याचे पालकत्व डॉ. योगेश बडगुजर यांच्याकडे सोपवण्याची घोषणा करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक बडगुजर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सहयोग सोशल ग्रुपचा उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच नि:स्वार्थ भावनेने केलेल्या अनेक उपक्रमांबद्दल आम्ही अवगत असून, त्याबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. देवगिरी कल्याण आश्रम हे कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय सामाजिक संस्था व लोकवर्गणी यांच्या मदतीने करत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.

सूत्रसंचालन डॉ. सुनील लोखंडे व आभार प्रदर्शन डॉ. योगेश बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन, उपाध्यक्ष डॉ. संदीप जैन, सचिव डॉ. सुनील लोखंडे, सहसचिव डॉ. महेश मोरे, कोषाध्यक्ष डॉ. योगेश बडगुजर, गुड्डू जिरे, सोहेल मंसूरी, रवी चव्हाण, महेंद्र सूर्यवंशी, देवेंद्र चव्हाण, प्रमोद जहांगीर, नितीन पटेल, राहुल पाटील, राकेश भोई यांनी परिश्रम घेतले.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी यासाठी देवगिरी कल्याण आश्रम संचलित एकलव्य छात्रालय वसतिगृह अक्कलकुवा येथे चालवण्यात येत आहे. सुमारे ३५ विद्यार्थी याचा लाभ घेतात. या इमारतीच्या पुनरुज्जीवनाचे व दोन रूमची रंगरंगोटी तसेच संपूर्ण वसतिगृहाच्या लाईट फिटिंगचे काम सहयोग सोशल ग्रुपतर्फे करण्यात आले. नूतनीकरण केलेले दोन रूम व दैनंदिन आवश्यक भांडी यांच्या समर्पणाचा कार्यक्रम अक्कलकुवा येथील एकलव्य छात्रावासात घेण्यात आला.

Web Title: Helping hand of Sahayog Social Group to the students of Devagiri Kalyan Ashram Hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.