शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

पालकांच्या मदतीने शाळेचा वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

यावेळी मुख्याध्यापक ठोंबरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरसह शासनाच्या नियमांचे पालन करून शाळा व्यवस्थापन ...

यावेळी मुख्याध्यापक ठोंबरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरसह शासनाच्या नियमांचे पालन करून शाळा व्यवस्थापन समिती व पालकांशी संपर्क करून सभा घेतली. यावेळी वीज बिलाबद्दल माहिती देत शाळेचा वीजपुरवठा खंडित करू नये अशी विनंती उपस्थित वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे केली. त्यांनी मुख्याध्यापकांच्या विनंतीला मान देऊन त्वरित खंडित होणारा वीजपुरवठा काही कालावधीसाठी चालू ठेवला. परंतु आलेला प्रश्न या ठिकाणी सुटलेला नव्हताण प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी मुख्याध्यापक ठोंबरे यांनी पालकांची बैठक घेण्याचे ठरविले. त्यानुसार शाळेचा वीज बिला संदर्भाचा प्रश्न मांडून पालकांना शाळेत असलेल्या डिजिटल साहित्य व त्यासाठी आवश्यक असणारा विद्युतपुरवठा किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले. यावेळी पालकांनी हा विषय समजून घेत आम्ही वर्गणी काढून वीज बिल भरणार असल्याचे सांगितले व तत्काळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र वसावे, धीरू वसावे, विजय गावीत, कृष्णा वसावे, गोविंद वसावे, लता वसावे, राजू वसावे, दिलीप वसावे व सुरेश वसावे यांनी पुढाकार घेत इतर पालकांना याबद्दल समजावून सांगत वर्गणी जमा केली. जमलेल्या वर्गणीतून पाच हजार ४० रुपयांचा वीज भरणा केलाण यापुढेही पालकांचा गट करून प्रत्येक महिन्याचे वीज बिल भरणार असल्याचे ठरविण्यात आले. या निर्णयाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक बालकिसन ठोंबरे व उपशिक्षिका अलका पाडवी यांनी सर्व पालकांचे, शाळा व्यवस्थापन समितीचे शाळेच्यावतीने आभार मानले. या उपक्रमाचे केंद्रप्रमुख कदमबांडे, विस्तार अधिकारी पवार व गटशिक्षणाधिकारी चौरे यांनी कौतुक केले.