शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटसह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात ुदुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पावसाचा जोर अधीक होता. नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात ुदुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पावसाचा जोर अधीक होता. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील अनेक ठिकाणी तुरळक गारपीट देखील झाली. यामुळे मात्र गहू, कांदा, पपई, आंबा या पिकांचे नुकसान झाले.जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी सांयकाळी पावसाने हजेरी लावली. शहादा, नंदुरबार, नवापूर तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेचार वाजेपासून हवा सुरू झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नंदुरबारसह परिसरात साधारणत: २० ते ३० मिनिटे पाऊस झाला. नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा, शिंदे, खोंडामळी परिसरात तुरळक स्वरूपाची गारपीट झाली.अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे रस्त्यांवरू पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी पाण्याचे डबके देखील साचले. शेतांमध्ये देखील पाणी साचले होते. घरांचे देखील या पावसामुळे नुकसान झाले.पावसामुळे मात्र गहू, हरभरा, कांदा या पिकांसह पपई, आंबा पिकाचे देखील नुकसान झाले आहे.शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आधीच संचारबंदीमुळे नागरिक घरात बसून आहेत. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे समस्येत भर पडली आहे.वीज कंपनीकडे कर्मचाऱ्यांची कमरता असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत झाली होती.नंदुरबार शहरासह परिसरात गुरुवारी रात्री देखील पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे जनजीवनावरतळोदा तालुक्यातील अनेक भागात देखील पावसाने हजेरी लावली. मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता.आंबा,हरभरा, कांदा, गहू, पपई पिकांना फटका