तळोद्यात हार्डवेअरच्या दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:00 IST2020-08-11T13:00:25+5:302020-08-11T13:00:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरातील अक्कलकुवा बायपास रोडवरील मोटार सायकलच्या स्पेअर पार्टच्या दुकानांना आग लागून साडेतीन लाखांचे ...

A hardware store in the basement caught fire | तळोद्यात हार्डवेअरच्या दुकानाला आग

तळोद्यात हार्डवेअरच्या दुकानाला आग

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा शहरातील अक्कलकुवा बायपास रोडवरील मोटार सायकलच्या स्पेअर पार्टच्या दुकानांना आग लागून साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर असे की, रविवार रात्री १० वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील अक्कलकुवा बायपास रोडवरील बालाजी पेट्रोल पंप जवळ असणाऱ्या मोटार सायकलच्या दुकानांमधून धूर निघत असल्याचे काही जणांना दिसून आले. त्यांनी याबाबत दुकान मालकांना कळविले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या वेळी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान दुकानातील सुमारे साडेतीन लाखाचे मोटर सायकलचे स्पेअर पार्ट, आॅईल, मडगार्ड, हेल्मेट टोपी रुमाल, सीट कव्हर व फायबरचे सामान अन्य असे अंदाजे तीन लाख ५० हजार रूपयांचे सामान आगीत जळून खाक झाले आहे. आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत रफिक बाबुलाल पिंजारी यांच्या खबरीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अग्निउपद्रवांतर्गत घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक वनसिंग पाडवी हे करीत आहे.

Web Title: A hardware store in the basement caught fire