७० हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:27 IST2020-07-25T12:27:15+5:302020-07-25T12:27:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खेडदिगर, ता.शहादा येथे पोलिसांनी ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. वाहनासह एकुण १० लाख ...

Gutkha worth Rs 70,000 seized | ७० हजारांचा गुटखा जप्त

७० हजारांचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खेडदिगर, ता.शहादा येथे पोलिसांनी ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. वाहनासह एकुण १० लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहादा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडदिगर येथे गुटख्याचा साठा असल्याची माहिती म्हसावद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार म्हसावद पोलिसांच्या पथकाने गावात पाळत ठेवली. २३ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास संशयीत पीकअप गाडी जात असतांना तिला हनुमान मंदीरासमोर थांबविले. पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात तब्बल ७० हजार ५०० रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला.
पोलिसांनी गुटखा व दहा लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण १० लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलीस कर्मचारी फुलसिंग रफिक हसमानी यांनी फिर्याद दिल्याने रोहित रफिक हसमानी, रा.शहादा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बिºहाडे करीत आहे.

Web Title: Gutkha worth Rs 70,000 seized