शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा जप्तीची कारवाई नंदुरबारात; पण साठा होतोय धुळ्याच्या कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

नंदुरबार : गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून अवैध गुटका वाहतूक नित्याची झाली आहे. ही वाहतूक ...

नंदुरबार : गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून अवैध गुटका वाहतूक नित्याची झाली आहे. ही वाहतूक राेखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी कारवाई करत आहे; परंतु ही कारवाई केल्यानंतर जप्त केलेला गुटखा मात्र धुळ्याकडे रवाना करण्याची वेळ विभागावर आली आहे.

नंदुरबार येथे अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय जिल्हा निर्मितीच्या २० वर्षांनंतर २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाची जागा ही कोणताही मुद्देमाल ठेवण्याएवढी सुरक्षित व ऐसपैस नसल्याने धुळे कार्यालयाकडे गुटखा रवाना करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यातून पंचनामा किंवा न्यायालयीन कारवाईसाठी विभागाच्या निरीक्षकांना धुळे कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी लागत असल्याचे दिसून आले. यामुळे गुटखा तस्करीप्रकरणी दोषींवर कारवाईसही विलंब होतो.

गेल्या वर्षात लाॅकडाऊन काळात गुटख्याच्या चोरट्या वाहतुकीवर आळा बसला होता; परंतु जुलै महिन्यापासून चोरटी वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. या वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सातत्याने पाळत ठेवून होते. यातून वर्षभरात गुटका १० कारवाया करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या मोहिमेतून ९ लाख २८ हजार २३९ रुपयांचा अवैध गुटका जप्त करण्यात आला आहे. हा गुटका जप्त करण्यात आल्यानंतर गुटका बाळगणारे दुकानचालक, वाहतूकदार, टपरीचालक यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान पोलीस प्रशासनाकडूनही जिल्ह्यात गुटका जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने काही ठिकाणी छापा टाकून गुटकाही जप्त केला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून गेल्या सहा महिन्यांत सुमारे ८० लाखांच्या जवळपास गुटका व वाहतूक करणारी वाहने जप्त केल्याची माहितीही समोर आली आहे.

धुळ्याला रवाना होतोय मुद्देमाल

अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य कार्यालय धुळे येथे आहे. नंदुरबार येथे केवळ अन्न व औषध निरीक्षक अशी दोनच पदे भरण्यात आली आहेत. सोबत एक लिपिक वर्गीय कर्मचारी आहे. यातून लाखो रुपयांचा जप्त केलेला गुटखा ठेवणे व त्यावर लक्ष देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नसल्याने हा मुद्देमाल धुळे येथे रवाना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात यात बदल होण्याची शक्यता असून मुद्देमाल नंदुरबारातच ठेवला जाईल, अशी तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात चोरट्या गुटका विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाचे पथक लक्ष ठेवून आहे. त्यानुसार अन्न निरीक्षकांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात अवैध गुटका बाळगल्याने १० जणांवर कारवाई करत ९ लाखांचा मुद्देेमाल जप्त केला आहे. येत्या काळातही जिल्ह्यात अवैध गुटका जप्त करून गुन्हे दाखल करणे सुरूच राहणार आहे. नंदुरबार येथे मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्याचा साठा हा धुळे येथील कार्यालयात केला जात आहे.

-संतोष कांबळे

सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे