आठ जोडप्यांचा सामुहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:36 IST2020-03-03T12:35:54+5:302020-03-03T12:36:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मुला-मुलींच्या लग्नासाठी लागणारा महागडा खर्च कमी करण्यासाठी तळोदा येथे ख्वाजा गरीब नवाज वेलफेअर सोसायटीतर्फे ...

Group marriage of eight couples | आठ जोडप्यांचा सामुहिक विवाह

आठ जोडप्यांचा सामुहिक विवाह

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : मुला-मुलींच्या लग्नासाठी लागणारा महागडा खर्च कमी करण्यासाठी तळोदा येथे ख्वाजा गरीब नवाज वेलफेअर सोसायटीतर्फे सामुहिक विवाह सोहळा घेण्यात आला. त्यात मुस्लिम समाजातील आठ जोडप्याचा विवाह मुस्लिम समाज रितीरिवाज प्रमाणे लावण्यात आला.
दरवर्षी ख्वाजा गरीब नवाज सोसायटीचा यंदाचा हा १२ वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, ख्वाजा गरीब नवाज सोसायटीचे अध्यक्ष रईस अली अब्बास अली, योगेश चौधरी, नरहर ठाकरे, तापीबाई माळी, नगरसेवक हेमलाल मगरे, रामानंद ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी सद्यस्थितीत कुटूंबातीलच नव्हे तर श्रीमंत कुटुंबातील जोडपेही सामुदायिक विवाहात सहभागी होत आहे. त्यामुळे या पद्धतीचे महत्त्व सर्वच समाजांनी ओळखले आहे. असे सामुदायिक विवाह करणे काळाची गरज बनल्याचे सांगितले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ख्याजा गरीब नवाज सोसायटीचे उपाध्यक्ष मौलाना शोएब रजा नुरी, सचिव मुख्तार शहा अब्बास शाह, सहसचिव शेख इस्माईल, अय्या अन्सारी, खजिनदार हाजी सलीम, सदस्य शेख नासीर, नासीर सत्तार, रऊफ अन्सारी, शेख हशिर, शेख इब्राहिम, शेख रियाज, साबीर पिंजारी, मोहसीन अली, ईकास अली, जाकीर खा कुरेशी, जाविद अली, बिस्मिल्ला कुरेशी, जाकीर मंसुरी, शेख मोहियोद्दीन, शेख सत्तार मणियार, शेख पिरन खाटीक, अशफाक अली, शेख रफीक, शेख इरफान, शेख असलम आणि शेख वसीम यांनी परिश्रम घेतल. या सोहळ्याचे सूत्रसंचालन युनिस पठाण व आसिफ जैननुद्दीन यांनी केले.

Web Title: Group marriage of eight couples