शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

कुटूंबाने मतदान केल्यास घर व पाणीपट्टीत ग्रामपंचायत देणार सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूकीत संपूर्ण प्रत्येक कुटूंबांने 100 टक्के मतदान केल्यास त्यांची घर आणि पाणीपट्टीसह इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणूकीत संपूर्ण प्रत्येक कुटूंबांने 100 टक्के मतदान केल्यास त्यांची घर आणि पाणीपट्टीसह इतर करांमध्ये 10 टक्के सूट देण्याचा निर्णय कुकावल ता़ शहादा ग्रामपंचायतीने घेतला आह़े ग्रामपंचायतीने याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली असून त्यांच्या या निर्णयामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आही़े प्रत्येक नागरिकाने मतदान करावे यासाठी शासनाकडून जाहिरातबाजी आणि जनजागृती करण्यात येत आह़े यात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत़ यात नाविन्यपूर्ण असा निर्णय घेण्याचा मान यंदा शहादा तालुक्यातील कुकावल ग्रामपंचायतीने पटकावला असून एका घरातील सर्वच सदस्यांनी मतदान केल्यास त्यांना करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े दोन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या कुकावल गावच्या सरपंच वैष्णवी सनेर यांनी हा निर्णय जाहिर केला असून निर्णयाची प्रत्येकाला माहिती व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने पारंपरिक ‘दंवडी’ दिली होती़ ग्रामपंचायतीने प्रत्येक घर आणि गल्लीत दवंडी देऊन याबाबत जनजागृती केली आह़े निव्वळ मतदानापुरतेच मर्यादित न राहता ग्रामपंचायतीने शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सक्रीय सहभाग नोंदवला होता़ गावातील एका कुटूंबाने 2019 आणि 2020 या वर्षात किमान पाच वृक्षांची लागवड करुन योग्य पद्धतीने संगोपन केल्यास संबधितांची घरपट्टी, पाणी पट्टी 100 टक्के माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आह़े या उपक्रमासही ग्रामस्थ प्रतिसाद देत असल्याने मतदान संदर्भात केलेल्या घोषणेचेही चांगले फलित मिळून संपूर्ण गावाची 100 टक्के मतदान करणारे गाव अशी ओळख निर्माण होईल अशी अपेक्षा ग्रामपंचायत सरपंच वैष्णवी सनेर यांनी व्यक्त केली आह़े या उपक्रमामुळे हे गाव सध्या जिल्ह्यात चर्चेत आले आह़े