शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्यात ग्रामपंचायत रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे़ यापार्श्वभूमीवर तालुक्यात पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे़ यापार्श्वभूमीवर तालुक्यात पुन्हा राजकीय वारे वाहत असून १६ गावे आणि पाड्यांवर इच्छुकांची मोेर्चेबांधणी सुरु आहे़तालुक्यातील धनाजे बुद्रुक, भोगवाडे, उमराणी बुद्रुक, घाटली, खामला, काकर्दा, आचपा, मुंदलवड, मनवाणी बुद्रुक, खर्डा, सिसा, काकरपाटी, पाडली, वरखेडी बुद्रुक, कुंडल आणि हातधुई या १६ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत़ यापैकी काकर्दा, धनाजे, उमराणी, सिसा, भोगवाडे, कुंडल ही गावे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जातात़ याठिकाणी सत्ता मिळावी यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असून सदस्यांचे पॅनल निवडून आणण्यासाठी तयारी सुरु झाली आहे़ या ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून तालुक्यात प्रथमच लोकनियुक्त सरपंच निवड होणार आहे़ निवडून येणारे सर्व १६ सरपंच हे तालुक्याच्या आजवरच्या इतिहासात प्रथम लोकनियुक्त म्हणून ओळखले जाणार आहेत़ यामुळे निवडून येण्याच्या उद्देशाने इच्छुक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे चकरा मारत असल्याचे चित्र आहे़ येत्या ६ ते १३ मार्च दरम्यान नामनिर्देशन दाखल करता येणार आहेत़ अर्जांची छाननी १६ मार्च रोजी होणार असून १८ रोजी माघारीची अंतीम मुदत असून २९ रोजी मतदान होणार आहे़ मतदानाची मतमोजणी ही त्या-त्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार ३० मार्च रोजी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहिर करण्यात येणार आहे़