रेमडेसिविरवरील निर्यातबंदी उठविण्याचा शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:22+5:302021-04-17T04:30:22+5:30

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत उत्पादक निर्यातदार कंपन्यांच्या निर्यातबंदीचा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यामुळे आता महाराष्ट्रात हे ...

Government's decision to lift export ban on remedicivir | रेमडेसिविरवरील निर्यातबंदी उठविण्याचा शासनाचा निर्णय

रेमडेसिविरवरील निर्यातबंदी उठविण्याचा शासनाचा निर्णय

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत उत्पादक निर्यातदार कंपन्यांच्या निर्यातबंदीचा निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यामुळे आता महाराष्ट्रात हे इंजेक्शन लवकरच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. याबाबत गुरुवारी माजी आमदार शिरीष चौधरी व डाॅ.रवींद्र चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला होता.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक या इंजेक्शनच्या उत्पादक निर्यातदार कंपन्यांना महाराष्ट्रात पुरवठा करण्याची परवानगी नसल्याने हे इंजेक्शन मिळत नव्हते. त्यासंदर्भात डाॅ.रवींद्र चौधरी व शिरीष चौधरी यांनी मंत्र्यांची भेट घेऊन त्यातील अडचणी व प्रश्न कसा सुटू शकेल यासंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. त्याची दखल घेत शुक्रवारी राज्य शासनाने यासंदर्भातील निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात आता रेमडेसिविर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता असून हा प्रश्न सुटणार आहे.

Web Title: Government's decision to lift export ban on remedicivir