शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मावळते पदाधिकारी व सदस्यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मावळत्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांचा सन्मान रविवारी अधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अधिकारी व पदाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मावळत्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका:यांचा सन्मान रविवारी अधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयातून गेल्या पाच वर्षात विकासाची कामे करता आल्याची भावना यावेळी पदाधिका:यांनी व्यक्त केली. नंदुरबार येथील जिल्हा परीषदेतील याहामोगी सभागृहात माजी सदस्यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात      आला. याप्रसंगी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी दिलीप चौधरी, सामान्य प्रशासनचे उपमुख्य   कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता रविंद्र मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी, लेखाधिकारी शबाना शाह, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, पी.टी.बडगुजर आदी उपस्थित होते.कार्यक्रमात माजी अध्यक्ष भरत गावीत, बांधकाम समितीचे माजी सभापती दत्तू चौरे, समाज कल्याण समितीचे माजी सभापती आत्माराम बागले, आरोग्य समितीच्या माजी सभापती हिराबाई पाडवी, नंदुरबार पंचायत समितीच्या माजी सभापती रजंना नाईक, तळोद्याचे माजी सभापती शांतीबाई पवार, नवापुरच्या माजी सभापती सविता गावीत, माजी सदस्य रामचंद्र पाटील, अंबरसिंग पाडवी, सुनील चव्हाण, डॉ.कुमूदिनी गावीत आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.यावेळी भरत गावीत यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच पदाधिका:यांचा सत्कार होत असल्याचे सांगितले. अडीच वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक चांगले अनुभव मिळाले. खुर्चीला न्याय देण्याचा व लोकांचे काम करण्याकडे लक्ष दिले. प्रत्येक कामात सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चांगले सहकार्य लाभले. जिल्हयात अंसख्य प्रश्न आहेत ते सोडविण्याचा प्रय} होत आहेत. स्वच्छता अभियानात सर्वाना शौचालय व घरकुले देण्याचा प्रय} सभागृहाकडून झाला. कुपोषणमुक्तीसाठी सर्वानी एकत्र काम करण्याची गरज आहे. जि.प.ची रिक्तपदे भरण्यात यावीत तसेच सेसफंडाचे पारदर्शकपणे लोकांच्या गरजेप्रमाणे वाटप होवून त्यातून लोकांची कामे झाली पाहिजेत असेही सांगितले. सीईओ विनय गौडा यांनी पदाधिकां:यांच्या चांगल्या समन्वयातून जिल्हा परीषदेचा कारभार झाला त्यात समाधानी असून जिल्ह्याच्या विकासात सदस्यांचा मोठा वाटा असल्यांचे सांगितले. सविता गावीत व रणधीर सोमवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.राहुल चौधरी तर आभार डॉ.सारीका बारी यांनी    मानले.