कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपनाचा लाभ द्या- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:08+5:302021-06-22T04:21:08+5:30

डॉ.भारुड म्हणाले, बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. संपर्क न झालेल्या कुटुंबांची माहिती घेऊन त्या कुटुंबाचे ...

Give childcare benefits to children who have lost their parents due to corona- Collector | कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपनाचा लाभ द्या- जिल्हाधिकारी

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपनाचा लाभ द्या- जिल्हाधिकारी

डॉ.भारुड म्हणाले, बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. संपर्क न झालेल्या कुटुंबांची माहिती घेऊन त्या कुटुंबाचे सामाजिक सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे. योजनेच्या संदर्भात कोविडमुळे मृत्यू झालेल्या उर्वरित व्यक्तींची माहिती समितीसमोर सादर करावी.

कोविड-१९ मुळे घरातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा. बालगृह किंवा अनुरक्षणगृहात दाखल असलेल्या बालकांची आरोग्य पथकामार्फत नियमित तपासणी करावी.‍ तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता अशा बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दोन्ही पालकांचा मृत्यू झालेले ० ते १८ वयोगटातील एक आणि १९ ते ३० वर्ष वयोगटातील तीन मुले आहेत. तर एका पालकाचा मृत्यू झाले असे ० ते १८ वयोगटातील १७७ मुले आहेत. बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी १०२ कुटुंबातील १७७ मुले पात्र असून त्यापैकी १४६ मुलांचे बाल संरक्षण कक्षामार्फत सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या बालकांना तसेच दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती वंगारी यांनी यावेळी दिली. बैठकीत कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या ९३९ व्यक्तींपैकी ९१८ व्यक्तींची माहिती सादर करण्यात आली.

उर्वरित २१ व्यक्तींच्या कुटुंबाशी त्वरित संपर्क करून माहिती घ्यावी व पात्र बालकांना योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: Give childcare benefits to children who have lost their parents due to corona- Collector