मुलीची छेड काढून पित्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:50 AM2019-10-10T11:50:21+5:302019-10-10T11:50:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलीची छेड काढणा:यांना जाब विचारणा:या पित्यावर एकाने धारदार शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना ...

Girl kills father and strikes father | मुलीची छेड काढून पित्यास मारहाण

मुलीची छेड काढून पित्यास मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुलीची छेड काढणा:यांना जाब विचारणा:या पित्यावर एकाने धारदार शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना जीटीपी महाविद्यालय परिसरातील भिलाटीत घडली़ मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारानंतर  दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला़ यातील एक संशयित अल्पवयीन आह़े 
जीटीपी महाविद्यालय भिलाटी परिसरात रात्री 11  वाजेच्या सुमारास चहाच्या टपरीवर 13 वर्षीय बालिका चहा वाटप करत असताना किशन कन्हैय्या भिल रा़माळीवाडा व त्याच्यासह एक अल्पवयीन असे दोघे आले होत़े दरम्यान किशन भिल याने चहा वाटणा:या 13 वर्षीय मुलीचा हात धरुन विनयभंग केला़ ही बाब मुलीच्या वडीलांना दिसून आल्यानंतर त्यांनी किशन भिल यास जाब विचारला होता़ याचा राग आल्याने त्याने पिडित मुलीच्या वडीलांना मारहाण करत जवळ असलेल्या कैचीने शरीरावर वार केला़ यात बरगडीला गंभीर दुखापत झाली़ दरम्यान सोबत असलेल्या अल्पवयीन संशयिताने त्याच्याजवळील  फायटरने पिडित मुलीच्या वडीलांच्या पाठीवर मारहाण करुन जखमी केल़े खोडाई माता यात्रोत्सवात रात्री उशिरार्पयत गर्दी असल्याने घटनेनंतर घबराट पसरली होती़ 
पिडित मुलीच्या वडीलांनी बुधवारी पहाटे शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन किशन भिल व सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने हल्ला करणारा संशयित आरोपी किशन भिल याला अटक केली आह़े 
 

Web Title: Girl kills father and strikes father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.