शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
3
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
4
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
5
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
6
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
7
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
8
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
9
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
10
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
11
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
12
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
13
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
14
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
16
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
18
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
19
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
20
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

खापर बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असून, व्यावसायिक अथवा ग्राहक ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असून, व्यावसायिक अथवा ग्राहक कुठल्याही नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा गावात पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने यावर नियंत्रण मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने बाजारपेठेतील भाजीपाला मार्केट गावाबाहेरच्या जिनिंग प्रेसिंग परिसरातील मोकळ्या जागेत हलवण्यात आली होती. या मोकळ्या मैदानात भाजी बाजार गेल्यानंतर बाजारपेठेत किराणा, कापड व्यावसायिक, मेडिकल व चप्पल विक्रेत्यांसह यासह किरकोळ व्यवसायिक असल्याने बाजारपेठेतील गर्दी आटोक्यात आल्याने सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न एवढा उद्भ्वत नव्हता. परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे मैदानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजीपाला व्यवसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने. भाजीपाला विक्रेते पुन्हा बाजारपेठेतील मुळ जागी परत आल्यामुळे बाजारपेठेत सकाळीच्या वेळेस प्रचंड गर्दी होत असते.गेल्या तीन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाल्यामुळे घरांवर टाकण्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतील दुकानांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याप्रसंगी दुकानदार किंवा ग्राहक कोणीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करतांना दिसून येत नाहीत. तसेच तोंडाला मास्क अथवा रूमाल बांधण्याची तसदी सुद्धा घेतांना दिसून येत नाहीत. त्यामुळे खापर बाजारपेठेत सर्वच आलबेल सुरू असून, पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत कोणावरही कार्यवाही करीत नसल्याने नागरिक व व्यवसायीक मनमानी करीत असल्याचे दिसून येत आहे.शासनाने काही व्यवसायीकांना वेळेची सुट दिलेली आहे. परंतु येथे सकाळी सहा वाजेपासून ते सायंकाळी सात आठ वाजेपर्यंत व्यवसायीक व्यवसाय करतांना दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे पान गुटख्याच्या टपऱ्या बंद असतांना पोलिसांच्या आशिर्वादाने सट्ट्याच्या पिढ्या गावात सुरू झाल्याने खेड्या-पाड्यातील लोक गावात या टपऱ्यांच्या आडोशाल थांबून गर्दी करीत आहे. त्यामुळे गावात उशिरापर्यंत लोक राहत असल्याने व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने उशिरापर्यंत उघडी ठेवत आहेत.पावसाला सुरूवात झाल्याने बियाणे खरेदीसह शेतीउपयोगी साहित्य खरेदीसाठी परिसरातील ६० खेड्यांवरील नागरिक खापर येथील बाजार पेठेत विविध साहित्य खरेदीसाठी येत असून, काही रिक्षातून, चारचाकी वाहनातून तर काही मोटारसायकल घेऊन बाजारपेठेत येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाहनांची गर्दीदेखील होत असल्याने बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा प्रश्नही उपस्थित होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी आहे.खापर परिसरातील खेड्या पाड्यात गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, बारडोली, अंकलेश्वर आदी शहरातील कंटेनमेंट झोनमधून मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग परत त आलेला आहे. अनेकांच्या नोंदी आरोग्य यंत्रणेकडे नसून, अश्या नोंदी नसलेले लोक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. प्रसंगी जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार असून, सहकार्य करावे, अशी अपेक्षा केली जात आहे.