खापर बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:58 AM2020-06-07T11:58:47+5:302020-06-07T11:58:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असून, व्यावसायिक अथवा ग्राहक ...

The fuss of social distance in Khapar market | खापर बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

खापर बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असून, व्यावसायिक अथवा ग्राहक कुठल्याही नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा गावात पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने यावर नियंत्रण मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने बाजारपेठेतील भाजीपाला मार्केट गावाबाहेरच्या जिनिंग प्रेसिंग परिसरातील मोकळ्या जागेत हलवण्यात आली होती. या मोकळ्या मैदानात भाजी बाजार गेल्यानंतर बाजारपेठेत किराणा, कापड व्यावसायिक, मेडिकल व चप्पल विक्रेत्यांसह यासह किरकोळ व्यवसायिक असल्याने बाजारपेठेतील गर्दी आटोक्यात आल्याने सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न एवढा उद्भ्वत नव्हता. परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे मैदानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजीपाला व्यवसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने. भाजीपाला विक्रेते पुन्हा बाजारपेठेतील मुळ जागी परत आल्यामुळे बाजारपेठेत सकाळीच्या वेळेस प्रचंड गर्दी होत असते.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाल्यामुळे घरांवर टाकण्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतील दुकानांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याप्रसंगी दुकानदार किंवा ग्राहक कोणीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करतांना दिसून येत नाहीत. तसेच तोंडाला मास्क अथवा रूमाल बांधण्याची तसदी सुद्धा घेतांना दिसून येत नाहीत. त्यामुळे खापर बाजारपेठेत सर्वच आलबेल सुरू असून, पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत कोणावरही कार्यवाही करीत नसल्याने नागरिक व व्यवसायीक मनमानी करीत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने काही व्यवसायीकांना वेळेची सुट दिलेली आहे. परंतु येथे सकाळी सहा वाजेपासून ते सायंकाळी सात आठ वाजेपर्यंत व्यवसायीक व्यवसाय करतांना दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे पान गुटख्याच्या टपऱ्या बंद असतांना पोलिसांच्या आशिर्वादाने सट्ट्याच्या पिढ्या गावात सुरू झाल्याने खेड्या-पाड्यातील लोक गावात या टपऱ्यांच्या आडोशाल थांबून गर्दी करीत आहे. त्यामुळे गावात उशिरापर्यंत लोक राहत असल्याने व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने उशिरापर्यंत उघडी ठेवत आहेत.
पावसाला सुरूवात झाल्याने बियाणे खरेदीसह शेतीउपयोगी साहित्य खरेदीसाठी परिसरातील ६० खेड्यांवरील नागरिक खापर येथील बाजार पेठेत विविध साहित्य खरेदीसाठी येत असून, काही रिक्षातून, चारचाकी वाहनातून तर काही मोटारसायकल घेऊन बाजारपेठेत येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाहनांची गर्दीदेखील होत असल्याने बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा प्रश्नही उपस्थित होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी आहे.
खापर परिसरातील खेड्या पाड्यात गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, बारडोली, अंकलेश्वर आदी शहरातील कंटेनमेंट झोनमधून मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग परत त आलेला आहे. अनेकांच्या नोंदी आरोग्य यंत्रणेकडे नसून, अश्या नोंदी नसलेले लोक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. प्रसंगी जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार असून, सहकार्य करावे, अशी अपेक्षा केली जात आहे.

Web Title: The fuss of social distance in Khapar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.