फळपीक व भाजीपाला वाहतूक करता येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:49 PM2020-03-27T12:49:55+5:302020-03-27T12:50:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केळी, पपई, टरबूज, भाजीपाला सारखी पिके तयार असून अधिक काळ शेतावर राहिल्यास संपूर्ण पिकाची ...

Fruit and vegetable can be transported | फळपीक व भाजीपाला वाहतूक करता येईल

फळपीक व भाजीपाला वाहतूक करता येईल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केळी, पपई, टरबूज, भाजीपाला सारखी पिके तयार असून अधिक काळ शेतावर राहिल्यास संपूर्ण पिकाची नासाडी होऊ शकते. त्यामुळे पिकांच्या वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी परवाणगी दिली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती.
या फळ पिकांचे व शेतकºयांचे प्रचंड आर्थिक नुकसान लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यात शेतकºयाच्या एका शिष्टमंडळाने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेवून निवेदन दिले. केळी, पपई, टरबूज व भाजीपाला या पिकांना भारतात कुठेही विक्री करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली. जिल्हाधिकारी भारुड यांनी शेतकºयांना त्यांच्या शेतातील मान इतर राज्यात विक्रीस परवानगी देण्याचे आदेश तात्काळ दिले.
शेतकºयांनी केळी पपई टरबूज भाजीपाला सारखी पिके परराज्यात विक्री करावी तसेच याकामी तालुका कृषी अधिकाºयांची रितसर परवानगी पत्र घ्यावे असेही आवाहन जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे. याप्रसंगी भाजपा सरचिटणीस निलेश माळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील शेतकरी प्रतिनिधी छोटूभाई पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Fruit and vegetable can be transported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.