गुजरातमधून पायी येणारे ३४ मजूर क्वारंटाईनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:17 IST2020-04-07T12:17:32+5:302020-04-07T12:17:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील जुन्या सिमा तपासणी नाक्या जवळ सकाळी सात वाजता गुजरात मधील किम गावात मजुरी ...

The four laborers coming from Gujarat are in quarantine | गुजरातमधून पायी येणारे ३४ मजूर क्वारंटाईनमध्ये

गुजरातमधून पायी येणारे ३४ मजूर क्वारंटाईनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील जुन्या सिमा तपासणी नाक्या जवळ सकाळी सात वाजता गुजरात मधील किम गावात मजुरी करणारे मध्यप्रदेशातील ३४ मजूर पायी गावाकडे जात असतांना प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी करुन कॉरेंटाईन केले.
दरम्यान, सिमा पार करुन येणाऱ्या नागरिकांसाठी सिमा परिवहन तपासणी नाक्यावर तात्पुरते शेल्टर होम उभारण्यात आले आहे.
किम येथुन चार एप्रिल रोजी इंदौर कडे जाण्यासाठी ३४ मजुरांनी पायी प्रवास सुरु केला. पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांनी शहरहद्दीत प्रवेश केला. ही बाब कळताच पोलीसांनी त्यांना सिमा परिवहन तपासणी नाक्यावर नेले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र पाडवी. डॉ. पाटील, डॉ. वळवी यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. कुणासही कोरोनासदृश्य लक्षणे दिसुन आली नसल्याचे आरोग्य विभागाने यावेळी स्पष्ट केले. असे असले तरी दक्षता घेण्यात येत आहे.
लॉकडाउनच्या कालावधीपर्यंत त्यांना शेल्टरहोम मध्ये ठेवले जाणार असुन त्या सर्वांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले.
शहरातील स्वयंसेवी संस्था बाबा अमरनाथ ग्रुप च्या वतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

Web Title: The four laborers coming from Gujarat are in quarantine